
पंतप्रधान नरेंद्र मोदींची येत्या शनिवारी गोव्यात जाहीर सभा आहे. गोव्यातील वास्कोमध्ये होणार जाहीर सभा. दक्षिण गोव्यात भाजपकडून पल्लवी धेपे तर गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक निवडणुकीच्या रिंगणात. भाजपच्या दोन्ही उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदी घेणार जाहीर सभा. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह भाजप नेते सभेत सहभागी होणार. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार उद्या संध्याकाळी संपणार. 12 राज्यांमधील 88 लोकसभा मतदारसंघांमध्ये 26 एप्रिलला होणार मतदान. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी तब्बल 1206 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. दुसऱ्या टप्प्यातील मतदानात अनेक हायप्रोफाईल उमेदवार. राहुल गांधी, एनी राजा, शशी थरूर, नवनीत राणा, ओम बिर्ला ,हेमामालिनी , अरुण गोविल, प्रल्हाद जोशी यांची प्रतिष्ठा पणाला. महाराष्ट्रात 8 मतदारसंघांमध्ये 26 एप्रिलला होणार मतदान तर कर्नाटक राज्यात बेळगावसह 14 मतदारसंघांमध्ये 26 एप्रिलला मतदान. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाला. या अवकाळी पावसामुळे उकड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पण या पावसामुळे शेतात उकडून वाळविण्यासाठी ठेवलेल्या हळद पिकाची नुकसान होण्याची शक्यता आहे.
बच्चू कडू यांनी सायन्स कोर मैदानावर ठिय्या मांडला आहे. या मैदानावर सभा घेण्यासाठी प्रहारला परवानगी दिलेली असताना, ती रद्द केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमित शाह यांच्या सभेला परवानगीची गरज नाही. सुरक्षेचं कारण सांगून तुम्ही आमच्या सभेला परवानगी कशी नाकारता? असा प्रश्न बच्चू कडू यांना उपस्थित केला. यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांना भाजपचा दुपट्टा गळ्यात घालण्याचा सल्ला दिला. यावेळी पोलीस आणि बच्चू कडू यांच्यात बाचाबाची झाली.
दिल्ली अब दूर नही दिल्ली मे शिट्टी बजेगी, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी परभणीत विरोधकांचा समाचार घेतला. महाविकास आघाडीत एकमेकांच्या पायात पाय घालून एकमेकांना पडायचे काम सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नखांची सुद्धा बरोबरी विरोधकांना येणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
नवी मुबंईतील APMC बाजारात कानपुरी टरबूज दाखल झाले आहे.सध्या टरबूजचा सीजन सुरु झाला आहे त्यामुळे विविध भागातून टरबूज एपीएमसी बाजारात दाखल होत आहेत. महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून टरबूज एपीएमसी बाजारात येत आहेत सध्या आवक वाढली असल्याने दर सुद्धा स्थिर आहे. 25 ते 35 रुपये किलोने टरबूज विकले जात आहेत,
अशोक चव्हाण यांनी मर्यादेत बोलावं त्यांचे खूप अंडे पिल्ले मला माहिती आहेत , त्यांचे अंडे पिल्ले बाहेर काढू असा इशारा नाना पटोले यांनी दिला.अशोक चव्हाणांची स्थिती राज्याच्या राजकारणात नाही तर गल्लीच्या राजकारणातही किंमत नाही,असा टोला त्यांनी लगावला.
अमरावतीच्या सायन्सकोर मैदानाच्या आरक्षणावरुन वाद पेटला आहे. उद्या नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमित शहांची सभा व बच्चू कडू यांच्या उमेदवारांची देखील याच ठिकाणी सभा आयोजित केली आहे. तर बच्चू कडू यांनी सभेसाठी मैदान केले होते अगोदरच आरक्षित तर राणा यांच्याकडूनही सायन्स कोर मैदान आम्ही आरक्षित केल्याचा दावा केला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार शरद पवार आणि अपक्ष उमेदवार सोहेल शेख यांना तुतारी हे चिन्ह देऊन सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न केला जातोय… यावरच शिरूर लोकसभेचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
पंकजा मुंडे आल्याने प्रतापराव जाधव यांचे विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. लोकनेत्या म्हणून पंकजा मुंडे आपल्याकडे पहिल्या जाते. देशाची प्रतिमा नरेंद्र मोदी मुळे झालीय. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. महाराष्ट्राचा विकास होत आहे. कोण प्रगती करू शकतो, याची जाण ठेवणे गरजेचं आहे, असं डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले.
मावळ लोकसभेकचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे रोहित पवार रॅलीमध्ये उपस्थित आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचं उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे.
67 वर्तमानपत्रांमध्ये जाहीर माफी मागितली आहे. येत्या काळात आणखी मोठ्या आकाराची जाहिरात प्रसिद्ध होईल, असं पतंजलीने सुप्रीम कोर्टाला सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाने या सुनावणीची व्याप्ती वाढवली आहे. हे प्रकरण फक्त एका संस्थेपुरते म्हणजे पतंजली पुरते मर्यादित राहणार नाही, असं कोर्टाने म्हटलंय.
कांदिवलीत मोबाईल चोराला मारहाण करण्यात आली आहे. कांदिवली पश्चिम लालजी पाडा परिसरात आज सकाळी 11 वाजता मोबाईल चोरून पळून जाणाऱ्या चोरट्याला लोकांनी पकडून मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा चोर मोबाईल चोरून पळून जात असल्याचा आरोप लोकांनी केला आहे. त्यानंतर लोकांनी त्याला रंगेहात पकडले. सध्या कांदिवली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नाशिक- भुजबळ फार्मवर समता परिषदेच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांकडून भुजबळांनी निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. भुजबळांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तपासात मुंबई पोलिसांना आणखी एक यश मिळालं आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचला गोळीबारात वापरलेली एक पिस्तूल सोमवारी सूरतमधील तापी नदीत सापडली होती. त्यानंतर आता नदीत फेकलेलं दुसरं पिस्तूलही पोलिसांना सापडलं आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही शोधमोहीम सुरू होती.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. एमएसआरडीसी हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर कि. मी. 19.100 इथं गॅन्ट्री बसवण्याचं काम आज करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या आणि जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामं करण्यासाठी आज ब्लॉक घेतला जाणार असून त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळावर परिणाम होणार आहे. कोकण रेल्वेच्या करंजाडी-चिपळूण विभागात मंगळवारी दुपारी 1.10 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत असा अडीच तासांचा ब्लॉक असणार आहे. ब्लॉकच्या वेळी सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेस, सावंतवाडी रोड ते रत्नागिरीदरम्यान 100 मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुअनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस कोलाड ते वीर दरम्यान 50 मिनिटांसाठी थांबवण्यात येईल.
अदानी वीज कंपनीची वीज महागली असून त्याचा फटका सुमारे 30 लाख वीज ग्राहकांना बसणार आहे. मे महिन्याच्या बिलापासून निवासी ग्राहकांच्या इंधन अधिभारात प्रति युनिट 70 पैसे ते 1.70 रुपये इतकी मोठी वाढ होणार आहे. मुंबईकरांना उन्हाचा तडाखा बसत असतानाच आता मे महिन्यापासून वीज दरवाढीच्या झळाही सहन कराव्या लागणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी साई मंदिराची तपासणी… श्वानपथकाकडुन साईमंदिरात तपासणी.. परभणीच्या पोलीस दलातील श्वानपथकडुन साईबाबांना मनाचा सॅल्युट… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी झाली तपासणी
काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आज धुळ्यात… महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक… महाविकास आघाडीचे उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळ्यात आदिवासी मेळाव्याचं आयोजन… काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती… शहरातील हिरे भवणात दुपारी दोन वाजता मेळाव्याचे आयोजन…
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या पुण्यात सभा होणार… प्रियांका गांधी यांचा पुण्यात रोड शो… मे च्या पहिल्या आठवड्यात होणार राहुल गांधी यांची सभा… काँग्रेसकडून जागांची चाचपणी सुरु… नरेंद्र मोदींची 29 तारखेला पुण्यात सभा त्यानंतर राहुल गांधींची सभा होणार…
एसी बंद झाल्याने ट्रेनमध्ये श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कल्याण स्टेशनवर प्रवाशांनी घातला गोंधळ… 8:45 ची कल्याण वरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या एसी लोकलमध्ये घडला प्रकार… प्रवाशांच्या गोंधळनंतर कल्याण आरपीएफ पोलिस घटनास्थळी दाखल होत दोन प्रवाशांना ताब्यात घेत ट्रेनमध्ये एसी सुरू न करता ट्रेन लावली मार्गी… पोलिसांनी पकडलेल्या प्रवाशांना लवकर सोडण्यात यावं अन्यथा रेल्वे संघटने कडून आंदोलनाचा दिला इशारा
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका नाही, हवामान खात्याने निवडणूक आयोगाला दिली माहिती. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगाला मोठा दिलासा.
26 एप्रिल रोजी होणाऱ्या 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका होणार आहेत तेथे हवामान सामान्य राहण्याची शक्यता. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांची निवडणूक आयोगाला माहिती
अमरावती येथील सायन्सकोर मैदानावरून नवनीत राणा व बच्चू कडू आमने सामने. अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात, कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सज्ज.
उद्या याच मैदानावर केंद्रीय मंत्री अमित शहा व बच्चू कडू यांची सभा. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी भाजपकडून मंडप उभारणीच काम अंतिम टप्प्यात
महायुती मध्ये पालघर लोकसभेचा तिढा अद्याप सुटलेला नाही, तरी भाजपकडून प्रचार सुरू. पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर पंतप्रधान मोदींचा फोटो असलेले मोठमोठे बॅनर्स अनेक ठिकाणी लावून प्रचाराला सुरवात करण्यात आली आहे.
ही जागा महायुतीत शिवसेना शिंदे गट की भाजपा लढविणार आणि उमेदवार कोण असणार हेही निश्चित झाले नाही. पालघर लोकसभेत उमेदवार जरी निश्चित नसला तरी भाजपाने प्रचार सुरू केला आहे
सांगली लोकसभेच्या आखाड्यात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे विशाल पाटील यांनी आपल्या प्रचाराला आता अधिकृतपणे सुरुवात केलीय. औदुंबर येथील दत्त मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत दत्ताचे दर्शन घेऊन विशाल पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलीय.
गेल्या चार दिवसांत सोलपूरमध्ये अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे सोलापुरात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे आंबा, द्राक्ष पिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
परभणी लोकसभा निवडणुकीसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. परभणी लोकसभेत प्रहार जनशक्ती पक्ष तटस्थ आहे. प्रहारकडून महाविकास आघाडी किंवा महायुती दोघांनाही समर्थन न देण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. आपल्याला बुद्धीनुसार मतदान करण्याचा आवाहन प्रहारचे परभणीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी पदाधिकाऱ्यांना केला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यातला संघर्ष चांगलाच पेटला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे प्रचार रॅली दरम्यान काही तरूणांकडून मोदी मोदीच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.
नाशिक लोकसभेच्या जागेवरील महायुतीचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता. दोन दिवसात हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्याचे आश्वासन. खासदार हेमंत गोडसे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मध्यरात्री घेतली एकनाथ शिंदेंची भेट. रात्री दोन वाजता नाशिक लोकसभेच्या जागेसंदर्भात हेमंत गोडसे यांनी नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी केली चर्चा. ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रात्री दोन वाजता झाली नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
मोहोळचे संजय क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मात्र संजय क्षीरसागर हे उद्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत संजय क्षीरसागर यांनी माहिती दिली. संजय क्षीरसागर यांनी भाजपकडून मोहोळ विधानसभा देखील लढवली आहे. भाजपत गेल्या दहा वर्षांत मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेली, त्यामुळे मी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर इन्सुलिनचा डोस दिला. साखरेची पातळी वाढत असल्याने पहिल्यांदा इन्सुलिनचा डोस दिला गेल्याची सूत्रांची माहिती. काल कोर्टाने एम्स डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली मंडळ स्थापन करण्याचा आदेश दिला होता. केजरीवाल यांना तिहार जेलमध्ये रात्री डॉक्टरांच्या मार्फत इन्सुलिनचा डोस दिल्याची माहिती.
बारामती लोकसभा निवडणुकीच्या मैदानात एकूण 38 उमेदवार आहेत. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक संघटना आणि अपक्ष लढणार निवडणूक. बारामतीमध्ये मुख्य लढत होणार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची काल होती शेवटची मुदत.