Maharashtra News Live: आग्र्यात शिवरायांचं स्मारक उभारण्यासाठी समिती स्थापन

देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra News Live: आग्र्यात शिवरायांचं स्मारक उभारण्यासाठी समिती स्थापन
Updated on: Dec 05, 2025 | 9:11 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 05 Dec 2025 09:40 AM (IST)

    जळगावच्या जामनेर येथील अंबिका गॅरेजमध्ये रात्री अचानक भीषण आग

    जळगावच्या जामनेर येथील अंबिका गॅरेजमध्ये रात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने प्रचंड रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण गॅरेज आगीच्या विळख्यात सापडले. या आगीत गॅरेजमधील साहित्य, वाहनांचे पार्टस, व इतर वस्तू असे सर्व जळून खाक झाले आहे. जामनेर नगरपालिकेचा अग्निशामक बंब, तसेच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत 1 ते दीड तासानंतर आग नियंत्रणात आणली..

  • 05 Dec 2025 09:30 AM (IST)

    जालन्यातील अंबड तालुक्यातल्या कौचलवाडी शिवरात कापसाच्या शेतात गांजाची लागवड

    जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात गांजाच्या लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारातील एका कापसाच्या शेतात थेट गांजाची झाडं लावल्याच समोर आले असून, अंबड पोलिस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे.

  • 05 Dec 2025 09:20 AM (IST)

    अंधारात मोबाईलवर बोलणे आलं अंगलट, थेट बिबट्याचा हल्ला

    ‘अंधारात मोबाईलवर बोलणे आलं अंगलट, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी’: नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगतची थरारक घटना. नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ रात्री सव्वा आठ वाजता 18 वर्षीय तनिष नवनाथ परदेशी या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. अंधारात मोबाईलवर बोलत उभा असताना बिबट्याच्या नख्या पोटरीवर ओरखडल्याने तो जखमी झाला, नशीब बलवंतर म्हणून त्याला जीवदान मिळाले आहे.

  • 05 Dec 2025 09:08 AM (IST)

    गोदावरी व उपनद्या अजूनही प्रदूषित कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचा गंभीर मुद्दा

    मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले 18 डिसेंबरपर्यंत भूमिका मांडण्याचे आदेश. राजेश पंडित विरुद्ध मनीषा खत्री प्रकरणाची आज सविस्तर सुनावणी. न्यायालयीन आदेशांचे प्रत्यक्षात पालन शून्य, असा याचिकाकर्त्यांचा आरोप. पिंपळगाव खांब व गंगापूर येथील STP सोडले तर मनपा–MPCB–MIDC–पोलीस कुठलीच कारवाई नाही

     

  • 05 Dec 2025 09:00 AM (IST)

    राज्यातील तब्बल 80 हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार

    संच मान्यता धोरण रद्द करा आणि टीईटीमधील संभ्रम दूर कर अशी मागणी करत शिक्षक संपावर गेले आहेत. राज्यातील तब्बल 80 हजार शाळा आज बंद आहेत. वेतनकपात आदेशानंतरही शिक्षक आंदोलनावर ठाम आहेत. आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे.

  • 05 Dec 2025 08:55 AM (IST)

    अंधारात मोबाईलवर बोलणे आलं अंगलट, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

    नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ रात्री सव्वा आठ वाजता १८ वर्षीय तनिष नवनाथ परदेशी या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. अंधारात मोबाईलवर बोलत उभा असताना बिबट्याच्या नख्या पोटरीवर ओरखडल्याने तो जखमी झाला, नशीब बलवंतर म्हणून त्याला जीवदान मिळाले आहे. तनिषला नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

  • 05 Dec 2025 08:45 AM (IST)

    राज्य निवडणूक आयोगावर हायकोर्टाची नाराजी

    नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीच्या घोळावर राज्य निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली. आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने झापले. हा घोळ टाळता आला असता असेही आयोगाला न्यायालयाने सुनावले.

  • 05 Dec 2025 08:35 AM (IST)

    वाढलेल्या थंडीचा भाजीपाल्याला फटका

    धुळ्यात टोमॅटोचा दर तब्बल 1000 रुपये कॅरेटवर पोहचला. वाढलेल्या थंडीमुळे टोमॅटो पिकत नसल्याने तब्बल एक हजार रुपये कॅरेटने टमाट्याची विक्री झाली आहे.आठवड्यात 400 ते 500 रुपये कॅरेट प्रमाणे विकले जाणार टोमॅटोला एक हजार रुपये कॅरेट दर मिळाला आहे. थंडीमध्ये टमाट्याची आवक घटल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाटा महागला आहे.

  • 05 Dec 2025 08:25 AM (IST)

    आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणार्‍या वर केली MPDA कारवाई

    समर्थ पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुंड मंथन सचिन भालेराव वय 19 वर्षे राहणार भवानी पेठ,पुणे याचेवर पुणे पोलीस आयुक्त यांनी MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध कारवाई केली आहे. मंथन भालेराव याने आंदेकर टोळीचे उदात्तीकरण करणारे स्टेटस त्याचे INSTAGRAM अकाउंट वर ठेवले होते. त्यावेळी तात्काळ समर्थ पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली होती. Social media च्या माध्यमातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांसाठी हा कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • 05 Dec 2025 08:21 AM (IST)

    जुन्नरच्या धोलवडमध्ये रात्री बिबट्याचे दर्शन

    जुन्नर तालुक्यातील धोलवड येथे स्तंभलेखक संजय नलावडे यांच्या घरासमोरच रात्री पावणेदोन वाजता बिबट्याचे दर्शन झाले आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाची कारवाई अपेक्षित नागरिक करत आहे. निसर्गरम्य धोलवड भागात बिबट्यांचा वावर वाढतेय.. त्यामुळे नागरिकानी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे रात्रीच्या वेळी सावध रहा, बिबट्याच्या हालचाली जाणवल्यास वन विभागाशी संपर्क साधा.

  • 05 Dec 2025 08:17 AM (IST)

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी मोठी गर्दी

    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायीच्या लांबच लांब रांगा लागल्या.उद्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन आहे. चैत्यभूमी ते शिवाजी पार्क मैदान परिसरात भीम अनुयायांच्या अभिवादन करण्यासाठी आजच मोठ्या रांगा लागल्या आहेत. गावाखेड्या पाड्यातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी चैत्यभूमी परिसरात दाखल झाला आहे

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संयुक्त घोषणापत्र जारी करतील. पुतीन हे दोन दिवसीय दौऱ्यावर भारतात आले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात विकसीत महाराष्ट्रासाठी फडणवीस सरकार कटिबद्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर आज राज्यातील शिक्षक संपावर आहेत. पुणे तालुक्यातील आंबेगाव परिसरात बिबट्यांचा मुक्तसंचार दिसून आला. तर आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर शिंदे सेना आणि भाजप यांच्यात कुरघोडी सुरू आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचा.