
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा असून मुंबईत राज्यतील प्रमुख नेते गृहमंत्र्यांसमवेत व्यासपीठावर असतील. राज्यातील राजकीय परिस्थीवर एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यातही चर्चा होण्याची शक्यता आहे. टोरेस घोटाळा प्रकरणातील कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा ताशेरे ओढले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबी पोलिसांनी अभिनेता सैफ अली खान याच्या घरी जाऊन त्याचा जबाब नोंदवला. याआधी करीना कपूरचा देखील वांद्रे पोलिसांनी जबाब नोंदवला होता. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज चर्चा होणार असून दोन्ही नेते तोडगा काढण्याची शक्यता आहे. आज रात्री ऊशिरा याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
सैफवरील हल्ल्याचा आरोपी शरीफुल इस्लाम शहजादला पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. न्यायालयाने त्याला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मध्य प्रदेशातील 17 धार्मिक शहरांमध्ये आजपासून मद्यविक्री आणि खरेदीवर पूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. महेश्वरमध्ये सुरू असलेल्या मंत्रिमंडळात दारूबंदीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
स्वबळाच्या संकेतानंतर उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केलं. स्थानिक नेतृत्वाला सक्षम करणं गरजेचं असल्याचं बैठकीत नेत्यांनी सूर लावला. राज्यभर बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
“जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान हा नवा नारा आहे. शेती हा फायदेशीर व्यवसाय आहे”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. गृहमंत्री मालेगावात बोलत आहेत.
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं अस्त्र बाहेर काढलं आहे. शनिवारपासून आरक्षणासाठी आंदोलन करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी टीव्ही9 सोबत बोलताना म्हटलं. “संतोष देशमुख प्रकरणातून मागे हटणार नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी उद्यापासून उपोषण करणार. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांसोबत दगाफटका करु नये”, जरांगे पाटील यांनी म्हटलं.
जालना जिल्ह्यात यंदा तुरीची लागवड मोठ्या प्रमाणत करण्यात आली होती.जवळपास 50 हजार हेक्टर क्षेत्रावर तूर असल्याने काढणीनंतर आता बाजार समितीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालीय. जालन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंत दीड लाख क्विंटल पेक्षा अधिक तुरीची आवक झाली. दररोज आठ ते नऊ हजार क्विंटल ची आवक होत आहे. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 7 हजार 500 रुपयांचा भाव मिळत असून शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण असल्याचं चित्र आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढली; 7 हजार रुपयांचा भाव मिळत आहे. आतापर्यंत दीड लाख क्विंटल पेक्षा अधिक आवक झाली आहे
पुण्यात गुईलेन बॅरो सिंड्रोम या आजाराचा धोका आता वाढताना दिसत असून कालपर्यंत जीबीएसचे एकूण 67 रुग्ण आढळले आहेत. यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं आहे. तसेच त्यांच्या हस्ते मंदिरात पुजाही करण्यात आली. आज (दि. २४ जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते मालेगावमध्ये विविध विकासकामांचे उद्धाटन करणार आहेत.
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला बांद्रा कोर्टात हजर करण्यात आलं आहे. आरोपी मोहम्मद शरीफुलला कोर्टात हजेरी लावण्यात आलं आहे. आरोपीनं गुन्ह्यात वापरलेलं हत्यार जप्त करण्यात आलं आहे. आरोपीची पोलीस कोठडी वाढवून मागितली आहे. तसेच आरोपीचा गुन्ह्यात साथीदार असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
छावा चित्रपटातून चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुण्यात मराठी क्रांती मोर्चाने छावा चित्रपटाला विरोध केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटातील ट्रेलरमधील काही प्रसंगावरून पुण्यातील शिवप्रेमी नाराज झाले असून मराठा क्रांती मोर्चातर्फे चित्रपटाला विरोध करण्यात आला.
पुण्यात या चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज व येसूबाई यांच्या बद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आला असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचेने केला आहे. ‘छावा’ या चित्रपटात दाखवण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराज व येसूबाई यांचे नाचतानाचे दोन प्रसंग हे आक्षेपार्ह असल्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्वरित हे दोन्ही प्रसंग चित्रपटातून वगळावे असे मराठा मोर्चेच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
वेस्टर्न रेल्वेने माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पश्चिम रेल्वेवर आजपासून पुढील तीन दिवस (24 जानेवारी 2025) ‘जम्बो मेगाब्लॉक’ घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास 330 पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.
भुजबळांनी बॅनर लावल्याने बॅनरची सर्वत्र चर्चा… केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मालेगावच्या दौऱ्यावर असून अजंग येथे सहकार परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला माजीमंत्री छगन भुजबळ हजेरी लावणार आहेत. छगन भुजबळ यांच्या वतीने मालेगावात अमित शहा यांचे स्वागताचे बॅनर लावल्याने चर्चांना उधाण आले आहे..
नालासोपाऱ्यात तोडक कारवाईला सुरवात झाली आहे… साई कृपा या 4 मजली इमारतीवर पहिला पोकलंड इमारत पडायला सुरुवात केली आहे.. या इमारतीमधील सर्व कुटुंब जबरदस्तीने घराबाहेर काढले आहेत. पोकलंड, दोन जेसीबी, 500 पोलीस, 300 महापालिका अधिकारी कर्मचारी या कार्यवाहीत सहभागी आहेत.. आज तीन इमारतीवर होणार कारवाई…
पोटदुखीचा त्रास झाल्याने वाल्मिक कराड याला आयसीयूत दाखल केले आहे.
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या दुसऱ्या हजेरीपूर्वी चित्रपट अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवण्यात आला.
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील मनसेच्या सर्व कार्यकारणी बरखास्त होणार आहे. नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.
मी माझ्या मतदार संघात जात आहे .प्रत्येक पक्ष मजबूत कसा होतो हे पाहतो… मी आता माझ्या मतदारसंघात जातोय अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.
मुंबईतील गोरेगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोरेगाव परिसरात एका महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सर्जिकल ब्लेड आणि खडे सापडले आहे. या प्रकरणी पोलीसांनी महिलेला हॉस्पिटल मध्ये दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. मात्र या प्रकरणी आता अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हातात गेलाय. शिंदेंसह त्यांचे लोक ईडी, सीबीआयच्या भीतीने पळून गेले – संजय राऊतांचे टीकास्त्र.
आदित्य ठाकरे हे बालिश आहेत, राजकारणाचा मूळ गाभा त्यांना समजलेला नाही, अशा शब्दांत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.
एकनाथ शिंदेच्या नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नजर, एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची उचलबांगडी केल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. मंत्रालयातील दलाल आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर गृहविभागाकडून वाॅच ठेवण्यात येत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यांचं डीप क्लीन होणार आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत आज रत्नागिरीतून पहिला ट्रेलर दाखवणार. त्नागिरीतून आज उदय सामंत उद्धव ठाकरे सेनेला खिंडार पाडणार. उद्धव ठाकरे सेनेतील जवळपास साडेचारशे कार्यकर्ते उद्धव ठाकरे सेनेला रामराम करणार असून तालुकाप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, सरपंच, उपसरपंच अशांचा आज बारा वाजता पक्षप्रवेश होणार आहे.
उद्धव ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, उपविभाग प्रमुख दत्ता तांबे, विभाग प्रमुख अप्पा घाणेकर, पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, विभाग प्रमुख महेंद्र झापडेकर आज शिंदे सेनेत पक्षप्रवेश करणार आहेत.
ठाकरे गटातील नेते बाळासाहेबांची विचारधारा सोडणार नाहीत . उद्योगमंत्री दावोसला गुंतवणुकीसाठी गेलेत की फोडाफोडीसाठी ? असा सवाल विचारत शरद पवार यांनी उदय सामंतांच्या फुटीच्या दाव्यावर टीकास्त्र सोडलं.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज चर्चा होणार असून दोन्ही नेते तोडगा काढण्याची शक्यता आहे. आज रात्री ऊशिरा याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.