NCP News: संसदेत विधेयक मांडण्याआधीच शरद पवारांना धक्का! थेट 2 खासदार….

स्वतः शरद पवार हे आजारी असल्यामुळे संसदेच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहतील अशी माहिती समोर आली आहे.  त्याचबरोबर शरद पवार यांच्या पक्षाचे भिवंडीचे लोकसभा खासदार सुरेश म्हात्रेही अनुपस्थित राहणार आहेत. 

NCP News: संसदेत विधेयक मांडण्याआधीच शरद पवारांना धक्का! थेट 2 खासदार....
NCP News
| Updated on: Nov 28, 2026 | 8:13 PM

Sharad Pawar NCP News:  केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून डिलिमिटेशन विधेयक आणण्याची तयारी सुरु केली आहे. या विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. मात्र संसदीय अधिवेशनाआधीच शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.  संसदेच्या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन खासदार अनुपस्थित राहणार आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयकाला शरद पवार यांच्या पक्षाचे दोन खासदार प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.  स्वतः शरद पवार हे आजारी असल्यामुळे संसदेच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहतील अशी माहिती समोर आली आहे.  त्याचबरोबर शरद पवार यांच्या पक्षाचे भिवंडीचे लोकसभा खासदार सुरेश म्हात्रेही अनुपस्थित राहणार आहेत.  सुरेश म्हात्रे हे आजारी असल्यानं संसदेच्या अधिवेशनाला अनुपस्थितीत राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Loading...

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us