शौचालयातल्या उग्र वासामुळे दोन तरुणांचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना

शौचालयातल्या उग्र वासामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईत घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. तर जाणून घ्या नेमकं काय झालं आहे.

शौचालयातल्या उग्र वासामुळे दोन तरुणांचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना
| Updated on: Sep 27, 2026 | 12:07 PM

मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील राम मंदिर परिसरातील एका सार्वजनिक शौचालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे दोघांना स्वतःचे प्राण गमवावे लागले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शौचालयात गेलेल्या केमिकलच्या उग्र वासामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही भयानक घटना पारसी पंचायत गेट समोर, मृणालताई ब्रिजजवळ घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर सकाळी साडेआठ वाजता सार्वजनिक शौचालयात केमिकलच्या वासाने दोघांना श्वास गुदमरल्याची माहिती मिळाली होती. घटनोची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अशात दोघांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांना बेशुद्ध अवस्थेत ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री 12 दोघांना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांवर देखली उापचार सुरु होते. पण उपचारादरम्यानच दोघांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे 3 वाजून 49 मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

शौचालयात येत असलेल्या उग्र वासामुळे ज्या दोघांनी आपले प्राण गमावले त्यांची नावे देखील समोर आली आहे. मृतांची ओळख 24 वर्षीय प्रभाकर धनिवार आणि 18 वर्षीय भावीन देसाई अशी झाली आहे. प्राथमिक तपासानंतर दम लागून मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, 108 रुग्णवाहिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बीएमसीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. आता शौचालयात केमिकलचा वास कुठून आला आणि दोन्ही तरुणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा पोलिसांचा कसून तपास सुरू आहे.

घडलेल्या या घटनेनंतर दोन्ही तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, शौचालय सार्वजनिक असला तरी, स्वच्छता फार गरजेची आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून तो संपूर्ण परिसर आणि शौचालय तात्काळ सील करण्यात आले आहे. अशात, केमिकल लीक नेमका कसा झाला आणि त्यामागे कोणाचा निष्काळजीपणा आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहे… तर याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us