शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीवर उदय सामंत संतापले, आता शेवटची संधी…, दिला मोठा इशारा

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीवरून उदय सामंत यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांचे कान टोचत मोठा इशारा दिला आहे.

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीवर उदय सामंत संतापले, आता शेवटची संधी..., दिला मोठा इशारा
Uday Samant
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 11, 2026 | 6:19 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. यावरून शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पदाधिकाऱ्यांचे कान टोचतानाच त्यांनी मोठा इशारा देखील दिला आहे. आपला मित्र पक्ष काय करतो, यापेक्षा शिवसेनेत काय चाललंय याकडे लक्ष द्या? गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा, असं उदय सांमत यांनी म्हटलं आहे, तसेच आता ही शेवटची संधी असा इशारा देखील यावेळी उदय सामंत यांनी दिला आहे. ते धुळ्यात बोलत होते.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत? 

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे. मित्रपक्ष काय करतो यापेक्षा शिवसेनेत काय चाललंय याकडे लक्ष द्या,  गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांना ही शेवटची संधी आहे, असा इशाराच यावेळी उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आज फक्त एकच आमदार आहे,  आणि आपणच दुसऱ्यांना संधी देत आहोत. नंदुरबारमध्ये 2 हजार पदाधिकारी, धुळ्यात मात्र ५० कार्यकर्तेही आणता आले नाहीत, आपण
साहेबांना फसवतोय का? याचे पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असं यावेळी सामंत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात पक्षाच्या सर्वाधिक तक्रारी या धुळ्यातून आहेत. ‘चांगलं काम करा, ही तुम्हाला शेवटची संधी आहे, अन्यथा धुळ्यात नवीन प्रयोग करून नवीन टीम उभी करण्यात येईल असा इशाराही यावेळी उदय सामंत यांनी दिला आहे. शिवसेनेचे चार सदस्य डीपीसीमध्ये आणि विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे असायला पाहिजे,  मनोज मोरे आणि सतीश महाले यांनी एकत्र येऊन संघटनेचे काम करावे. कार्यकर्ते आहेत म्हणून आपण आहोत,  साहेबांसोबत कार्यकर्त्यांचे फोटो काढा. संपूर्ण हॉल शिवसैनिकांनी भरला तरच पक्षाची खरी ताकद दिसेल एकनाथ शिंदेंमुळेच तुमचं अस्तित्व आहे. कार्यकर्त्यांना तुमच्या राजकारणात भरडू नका, शिवसेना पदाधिकाऱ्यांमधील वाद थांबवा, संघटना मजबूत करा, असं यावेळी सामंत यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us