AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BRICS मध्ये अर्ध जग एकवटताच अमेरिकन मीडियाला झोंबल्या मिर्च्या; थेट टीका करत म्हणाले…

दिल्लीतील ब्रिक्स संमेलनामुळे अमेरिकन मीडियाला धक्का बसला आहे. न्यूयॉर्क टाइम्ससह अनेक वृत्तपत्रांनी ब्रिक्सच्या विस्तारावर नकारात्मक टीका केली आहे. जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या आणि जीडीपी असलेले हे देश अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाला आव्हान देत आहेत, असे अमेरिकन माध्यमांना वाटते.

BRICS मध्ये अर्ध जग एकवटताच अमेरिकन मीडियाला झोंबल्या मिर्च्या; थेट टीका करत म्हणाले...
BRICS Summit DelhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 11, 2026 | 6:17 PM
Share

दिल्लीत ब्रिक्स देशांचं संमेलन सुरू होत आहे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस संमेलन होत आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासहीत अनेक देशांचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. याशिवाय चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग हे शनिवारी दिल्लीत येणार आहेत. जवळपास अर्ध जग दिल्लीत आलं आहे. मात्र, अमेरिकन मीडियाला या संमेलनाच्या चांगल्याच मिर्च्या झोंबल्या आहेत. अमेरिकेचं महत्त्वाचं वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने ब्रिक्सवर दोन वृत्तांत छापले आहेत. यातील एका रिपोर्टमध्ये या समिटवर थेट टीका केली आहे. त्यावरून अमेरिकन मीडियाला चांगल्याच मिर्च्या झोंबल्याचं दिसून येत आहे. अर्ध जग दिल्लीत जमणं हे अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देणारं असल्याचं अमेरिकेन मीडियाला वाटत आहे. त्यामुळेच समिटचा अमेरिकन मीडियाने नकारात्मक रिपोर्ट छापला आहे.

जगभरातील अर्ध्याहून अधिक देशाचे प्रतिनिधी या समिटमध्ये सामिल झाले असले तरी त्यांच्यात तीव्र मतभेद आहेत, असं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे. चीन, रशिया, ब्राझिल आणि भारताला वाटतं पाश्चात्य देशांवरील अवलंबित्व कमी व्हावं. त्यात यूएईसारखा देशही सहभागी आहे. यूएईची अमेरिकेशी संरक्षण भागिदारी आहे. या शिवाय इराणही यात आहे. याच इराणने यूएईवर हल्ला केला होता. अमेरिकेच्या निर्बंधानंतरही आम्ही एकटे नाही आहोत, हे दाखवण्याचा इराणचा प्रयत्न आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मंचावर एक पॉवर बॅलन्स सारखे आहेत. ते जिओपॉलिटिकल राजकारणात पॉवर बॅलन्स शोधत आहेत, असं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे.

यश मिळणार?

भारत आणि चीनच्या मतभेदावरही या वृत्तात म्हटलं आहे. भारत आणि चीन भलेही समूह संस्थापक सदस्य असेल. पण दोघांमध्ये तीव्र मतभेद आहेत. जगात बीजिंगचा प्रभाव वाढू नये हे भारताला नेहमी वाटतं. तसेच भारताने रशियाशी भलेही दोस्ती वाढवली असेल पण त्यांना अमेरिकेला विरोधही करायचा नाहीये. ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेसह इजिप्त, ईराण, सौदी अरब, इंडोनेशिया या समिटचा भाग आहेत. आणखी दहा देशांचाही यात समावेश आहे. या सर्वांची लोकसंख्या पाहिली तर जगाच्या अर्ध्या लोकसंख्ये एवढी आहे. जगातील 40 टक्के जीडीपी यांची आहे. एवढी मोठी ताकद असूनही या देशांमध्ये समान धागा असणाऱ्या गोष्टी फारच कमी आहेत. त्यामुळे या समिटला यश मिळण्याची शक्यता कमी आहे, असंही या वृत्तपत्राने म्हटलं आहे.

एक समान उद्देश नाही

हे देश एकसमान उद्देशासाठी आपआपसात संघर्ष करत आहेत. या समूहात कोणताही एक समान उद्देश नाहीये. चीन, रशिया आणि इराणचा प्रयत्न हाच आहे की अमेरिकेला पर्याय म्हणून एक वैकल्पिक वर्ल्ड ऑर्डर तयार व्हावी.याशिवाय काही देश अमेरिकेच्या जवळचे आहेत. पण ते या तीन देशांच्या मतांशी सहमत नाहीये, असंही या वृत्तपत्राने म्हटलं आहे. इजिप्तला अमेरिकेची मदत मिळालेली आहे. यूएईमध्ये तर अमेरिकेचा बेस आहे. रशिया आणि इराणला मात्र आपण एकटे नाही आहोत, हे दाखवायचं आहे. या समिटच्या माध्यमातून आपण जगाच्या मुख्य प्रवाहात आहोत हे दाखवण्याचा त्यांचा खटाटोप आहे. पाश्चात्य देशाच्या तुलनेत आपल्याकडे असंख्य ताकदवान देश आहेत हे दाखवण्याचा पुतिन यांचा प्रयत्न आहे, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर..
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर भरुन...