Uddhav, Raj Thackeray Mumbai morcha LIVE : Gen-Z चं मोठं यश; शिवाजी पार्कवर आज उद्धव-राज ठाकरेंची जल्लोष सभा

दिल्लीत Gen-Z चं मोठं यश मिळालं. विद्यार्थी आंदोलनापुढे मोदी सरकार झुकलं. त्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवाजी पार्कात उद्धव-राज ठाकरेंनी अभिनंदन मोर्चाचं आयोजन केलं आहे.

Uddhav, Raj Thackeray Mumbai morcha LIVE : Gen-Z चं मोठं यश; शिवाजी पार्कवर आज उद्धव-राज ठाकरेंची जल्लोष सभा
| Updated on: Jul 26, 2026 | 8:43 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 26 Jul 2026 08:43 AM (IST)

    लोकसभेत उद्या सरकार सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार

    लोकसभेत उद्या सरकार सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संसदेतही घडामोडींना वेग आलाय. सरकारच्या भूमिकेवर विरोधक काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

  • 26 Jul 2026 08:30 AM (IST)

    शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची सकाळी 11 वाजता सभा

    मुंबईतील दादरच्या वीर सावरकर मार्गावर उद्धव ठाकरे यांची जल्लोष सभा होईल. दोन्ही ठाकरे बंधूची सभा  सकाळी 11 वाजता होईल. या सभेला मोठ्या संख्याने तरुण हजर राहण्याची शक्यता आहे.  या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


  • 26 Jul 2026 08:21 AM (IST)

    मुंबईच्या वांद्रे परिसरातील प्रसिद्ध रंगशारदा हॉटेल ईडीकडून जप्त

    वांद्रे परिसरात असणारे प्रसिद्ध रंगशारदा हॉटेल ईडीकडून जप्त करण्यात आलं आहे. रंगशारदा हॉटेलची जप्त केलेली ३३२ कोटी इतकी असल्याचे ईडीने म्हटलंय. रंगशारदा हॉटेल्स प्रकरणात ही फसवणूक केल्याचा प्रभुदास लोटिया यांच्यावर आरोप करण्यात आलाय. ईडीने रंगशारदा प्रकरणातील कथित मनी लॉन्डरिंग तपासात कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे.

  • 26 Jul 2026 08:10 AM (IST)

    धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सेलिब्रिटींची प्रतिक्रिया व्हायरल

    धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी कॉक्रोच जनता पार्टीचं अभिनंदन केलं आहे. आता प्रधान यांच्या राजीनाम्यावरील सेलिब्रिटींची प्रतिक्रिया व्हायरल होऊ लागल्या आहेत.

नवी दिल्लीच्या जंतरमंतरवर 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. 12 वर्षांनंतर पहिल्यांदा PM मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांला राजीनामा द्यावा लागला. तसेच केंद्र सरकारने तरुणांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर आंदोलकांनी जंतरमंतर सोडलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रि‍पदाचा कारभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. विद्यार्थी आंदोलनाचं विरोधी पक्षानेही कौतुक केलं. दिल्लीत यशस्वी झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दादरच्या शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मोर्चाचे आयोजन केलं आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी होण्याची शक्यता आहे. या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. यासहित देशासहित राज्यातील विविध घडामोडी जाणून घेऊयात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us