Uddhav Thackeray : मला उपदेश द्यायचे, फेसबुकवरून सरकार चालत नाही, मग आता स्वत..उद्धव ठाकरेंचा एकदम रोकडा सवाल

"कोर्ट बाजी सुरू होईल. कोर्टात सुनावणी सुरू असताना या गद्दारांना भेटण्याचं कारण काय? हा संदेश कुणाला. कोर्टाला धमकी देत आहे का? की अमित शाह यांना धमकी देत आहेत" असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : मला उपदेश द्यायचे, फेसबुकवरून सरकार चालत नाही, मग आता स्वत..उद्धव ठाकरेंचा एकदम रोकडा सवाल
Uddhav Thackeray
| Updated on: Aug 08, 2026 | 12:57 PM

“कोरोना काळात मी फेसबुक लाइव्ह करायचो. त्यावेळी मला उपदेश द्यायचे, फेसबुकवरून सरकार चालत नाही. मग, आता यांच्यावर इन्स्टाग्रामवरून देश चालवण्याची वेळ आली आहे.एवढी यांची हालत खराब झाली आहे” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, भाजपवर हल्लाबोल केला. “एक बातमी आलेली, किती चॅनलने ती बारकाव्याने दाखवली की नाही माहीत नाही. पंतप्रधान तरुणांना भेटत नाही. मध्यरात्री फ्रेंड्स म्हणून इन्स्टावरून संदेश देतात” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “काँग्रेसने एवढ्या शिव्या कधीच खाल्ल्या नव्हत्या त्या मोदी आणि शाहांच्या वाट्याला आल्या आहेत. तरुणांना भेटायला वेळ नाही. ते गद्दारांना भेटत आहेत. शाह सेना स्थापन करणारे गद्दार पंतप्रधानांना भेटले. त्यांना भेटायला मोदींना वेळ आहे. शाह सेनेचे प्रमुख अमित शाह मुंबईत होते. त्यांचं गद्दाराने स्वागत केलं आहे” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

मोदींनी गद्दारांना सांगितलं… स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठिशी. तसं मोदी नवे स्वामी झाले का. तरुणाई त्यांची निंदा नालस्ती करते. पण मोदी महाशय गद्दारांना सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “गद्दारांना चिंता कशाची आहे. वॉशिंग मशीनमध्ये गेले. पण गद्दारीचा डाग काही जात नाही. देशातील तरुण न्याय हक्कासाठी आंदोलन करताना तुम्ही त्यांना भेटत नाही. बेशरमपणे गद्दारांना नुसते भेटत नाहीत, तर मी तुमच्या पाठिशी आहे असं बेशरमपणे सांगतात. त्यांनी तरुणांना भाऊ, आजोबा फ्रेंड्स म्हणून भिऊ नका मी तुमच्या पाठिशी आहे हे सांगायला पाहिजे होतं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिंदे टेन्शनमध्ये आल्याच्या बातम्या

“बंद दाराआडची चर्चा होती. तर त्यातील वाक्य बाहेर येण्याचं कारण काय? कुणाला संदेश द्यायचं आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीने शिंदे टेन्शनमध्ये आल्याच्या बातम्या आहेत. त्यांच्यासाठी तर हे वाक्य नाही ना. आमचे सहा खासदार फोडून महिना झाला. लोकसभा अध्यक्षाने अपेक्षने निर्णय दिला आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us