मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, नगरसेवकांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर थेट मातोश्रीवर..

शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडखोरी झाली. एका मागून एक मोठे धक्के ठाकरे गटाला बसताना दिसत आहेत. त्यामध्येच आता नाशिक महापालिकेतील ठाकरे गटाचे नगरसेवक पक्षातून बंडखोरी करणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, नगरसेवकांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर थेट मातोश्रीवर..
Uddhav Thackeray
| Updated on: Jul 14, 2026 | 8:47 AM

शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी होत आहे. ही बंडखोरी थांबवण्याचे मोठे आव्हान ठाकरे गटासमोर आहे. 6 खासदार आणि 1 विधान परिषदेच्या आमदाराने मोठी बंडखोरी केली. 6 खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेचे पत्र दिले. ही बंडखोरी थांबवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आला. पक्षाच्या बैठकीचे व्हिप जारी करण्यात आले. मात्र, 6 खासदार बैठकीला उपस्थित राहिले नाही. त्यानंतर मुंबईत दाखल होत या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे या बंडखोर खासदारांच्या मतदार संघात सभा घेताना दिसले. मात्र, ते या सभा पूर्ण करून मुंबईत दाखल झाले आणि विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन आहिर यांनी अर्ज केला आणि त्यांची निवड झाली. हा उद्धव ठाकरे यांच्याकरिता दुसरा मोठा धक्का होता. अजून काही आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचे सांगितले जातंय.

यादरम्यानच मातोश्रीवर राज्यातील सर्व आमदारांची बैठक पार पडली. राज्यात ऑपरेशन टायगर सुरू आहे. यादरम्यानच नाशिकमध्ये देखील ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला. बंडखोरी टाळण्याकरिता उद्धव ठाकरेच मैदानात उतरले आहेत.  नगरसेवकांची बैठक मातोश्रीवर घेतली जाणार आहे.

ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील 15 नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. बुधवारी मुंबईत ही बैठक होणार आहे. ही फक्त चर्चा आहे असे म्हणत, उद्धव ठाकरेंच्या स्थानिक नेत्यांनी यापूर्वीच हा दावा फेटाळून लावला आहे.

नगरसेवकांच्या भूमिकेसह नाशिक महापालिकेतील राजकीय समीकरण बदलणार असल्याची चर्चा आहे. संजय राऊत यादरम्यान नाशिक दाैऱ्यावर होते. पण त्यांचाही नाशिक दाैरा रद्द करून बैठक मातोश्रीवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी होत असतानाच हा मोठा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. बंडखोरी रोखण्याकरिता त्यांच्याकडून प्रयत्न केली जात आहेत.

Follow Us