मोहनजी, तुम्हाला हा भाजप मान्य आहे काय?; उद्धव ठाकरे यांचा थेट सरसंघचालकांना सवाल

Uddhav-Thackeray: माझ्यासोबत असला की ते साधू संत असतात. दुसऱ्याकडे गेला तर चोर, असे भाजपचे धोरण आहे. त्यांचे हे तुमचे हिंदुत्व कुठले आहे. भाजपचे हे हिंदुत्व थोतांड आहे.

मोहनजी, तुम्हाला हा भाजप मान्य आहे काय?; उद्धव ठाकरे यांचा थेट सरसंघचालकांना सवाल
uddhav thackeray
| Updated on: Sep 29, 2024 | 8:11 PM

शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे रविवारी नागपुरात होते. यावेळी नागपूरमधील तळ्याची पाल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे उद्घाटन त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रश्न केला. हा भाजप तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न विचारले. उद्धव ठाकरे म्हणाले, भागवतजी तुम्हाला भाजपचे हे हिंदुत्व मान्य आहे का. या भाजपमध्ये गुंड येत आहेत. भ्रष्टाचारी येत आहेत. हे तुम्हाला मान्य आहे का?

आता भाजपची परिस्थिती कशी?

माझ्यासोबत असला की ते साधू संत असतात. दुसऱ्याकडे गेला तर चोर, असे भाजपचे धोरण आहे. त्यांचे हे तुमचे हिंदुत्व कुठले आहे. भाजपचे हे हिंदुत्व थोतांड आहे. नागपूर हे संघाचे मुख्यालय आहे. मी मोहनजींना विचारतो की, आम्ही तुम्हाला हवेत की नको ते सोडा. पण ज्या पद्धतीने भाजप हिंदुत्वाचा थयथयाट करत आहेत ते तुम्हाला मान्य आहे का. भ्रष्टाचारी आणि इतरांना घेतले जात आहे.

संत्र्यांच्या शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट झाली. कापूसवाल्यांची परिस्थिती खराब झाली आहे. आता भाजपची हालत कशी झाली माहीत आहे माहीत आहे ना. संत्र्याला डिंक्या रोग येतो. खोडाला पोखरतो. भाजपला दाढीवाला ढिंक्या रोग झाला. खोड पोखरतो. कापसावर गुलाबी अळी पडते. जॅकेट असते की माहीत नाही. भाजपचं रोपटं संघाने पोसलं त्याला गुलाबी अळी आणि डिंक्या रोग लागलाय. हा भाजप तुम्हाला मान्य आहे का मोहनजी.

आता विधानसभा जिंकायची आहे…

लोकसभा जिंकली आहे. विधानसभा जिंकायची आहे. ते धर्माधर्मात मारामारी करत आहेत. लावालावी करत आहे. गोमूत्र धारी हिंदुत्व भाजपचे आहे. लोक मेले तरी चालेल पण आम्हीच सत्तेवर बसणार हे चालू आहे. दसरा मेळावा शिवतिर्थावर घेणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र फिरणार आहे.