
मुंबई : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू झालं आहे, उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय बोलतील, याविषयी सर्वांना उत्कंठा लाागून आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सुरुवातीला संजय राऊत यांचं भाषण होत असे, पण सध्या ते तुरुंगात आहेत. आज पहिल्यादा हा मान शिवसेनेच्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना मिळाला. हे भाषण पाहाण्यासाठी खाली लिंक दिली, या लिंकवर देखील आपण भाषण पाहू शकतात. उद्धव ठाकरे यांचं भाषण मुंबईतील शिवाजीपार्क म्हणजेच शिवतीर्थावर सुरु असताना, तिकडे मुंबईत बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील दसरा मेळावा सुरु झाला आहे.