
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरदरम्यान मराठवाड्याच्या दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती केली होती. आता संपूर्ण डेटा सरकारकडे आमचा आहे, ते कर्जमुक्ती करू शकतात. मुख्यमंत्र्यांनी जे पोकळ आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते त्याची मी पाहणी करणार. आज शेतकऱ्याला बाकी मदतीची अपेक्षा आहे. शेतकरी सांगतोय की, आम्हाला माती द्या. प्रत्येक हेक्टर 50 हजारांची शेतकऱ्यांची मागणी आहे. जे पॅकेज जाहीर केले होते, त्यापैकी शेतकऱ्यांना काय मिळाले हे मी पाहणार आहेत. दिवाळीपूर्वी तीन लाखांपैकी एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात द्या, असे आम्ही म्हटले होते. पण ते काही दिल्याचे मला वाटत नाही.
गायी, म्हशी, कोंबडा किंवा अजून काही शेतकऱ्यांना मिळाले का? हे मी बघणार आहे. आम्ही हा मुद्दा सोडणार नाहीत, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे. सत्ताधारी सोडून द्या, पण सर्व बाकीचे राजकीय पक्ष मतचोरी विरोधात एकवटले आहेत. आम्ही मतदारांच्या सोयीसाठी केंद्र उघडत आहोत. या मतदान केंद्रांमध्ये मी नागरिकांना विनंती करतो की, आपल्याला मतदान करता येणार आहे की, नाही. आपले नाव मतदार यादीत आहे की, नाही हे तुम्ही आमच्या शाखेत येऊन तपासा.
1 जुलै ही तारीख ठरवण्यात आलीये, तुम्ही जगभर बघता की, याच वयातील मुले रस्त्यावर येतात आणि क्रांती करतात, ज्यांना आपण जेन-जी म्हणतो. तर हे सरकार जेन-जींना काय घाबरतंय. 1 जुलैनंतर ज्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, ती महाराष्ट्रातील तरूण-मुले मुली मतदान करू शकणार नाहीत. मी त्या मुला मुलींना देखील सांगू इच्छितो की, तुम्ही आमच्या शाखेत या आणि तुमचे नावे तिकडे नोंदवा.
म्हणजे आपल्याला कळेल की, आपण किती लाख मुला मुलींना मतदानापासून वंचित ठेवत आहोत. मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती केल्याचे परत परत सांगताना उद्धव ठाकरे हे दिसत आहेत. मतचोरी आणि शेतकरी कर्जमुक्ती हे दोन्ही विषय आम्ही सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगताना उद्धव ठाकरे हे दिसले आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थशास्त्राबद्दल बोलतानाही उद्धव ठाकरे दिसले.