Uddhav Thackeray Speech Update : अंध भक्तांविरुद्ध देशभक्त जिंकले, झुरळाने हुकमूशहाला नमवलं, उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Speech Update : मोदीजी आता तरी देशाकडे लक्ष द्या. ते तुमचे मंत्री काम सोडून पक्ष फोडण्यात बिझी आहेत. त्यांना म्हणाव आता देशाचं काम करा. अर्थमंत्री निर्मला बाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत,

Uddhav Thackeray Speech Update : अंध भक्तांविरुद्ध देशभक्त जिंकले, झुरळाने हुकमूशहाला नमवलं, उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray
| Updated on: Jul 26, 2026 | 12:19 PM

नीट पेपर फुटी प्रकरणी मागच्या महिन्याभरापासून राजधानी दिल्लीत जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु होतं. पेपर फुटीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु होते. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या आंदोलनाला अखेक काल यश आलं. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याचं सेलिब्रेश करण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ठाकरे बंधुंनी जल्लोष सभा आयोजित केली आहे.

आधी ठाकरे बंधु आज शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढणार होते. पण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने या मोर्चाला जल्लोष सभेत बदललं आहे.त्या उद्धव ठाकरे बोलत आहेत.

उद्धव ठाकरे भाषण अपडेट्स 

देशातल्या देशभक्तांना अभिवादन करत आहे. कोणती निवडणूक कोणी जिंकलेलं नाही. अंध भक्तांविरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत. संघर्षाची सुरुवात झाली आहे. भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष आहे. या संघर्षात आपण सर्व जण जात, पात, धर्म विसरुन होय मी भीरतीय, देशभक्त आहे या एकाच भावनेने सहभागी झाले आहेत. काल एका झुरळाने हुकमूशहाला नमवलं हा खरा विष्णूचा अवतार आहे.

मोदीजी आता तरी देशाकडे लक्ष द्या. ते तुमचे मंत्री काम सोडून पक्ष फोडण्यात बिझी आहेत. त्यांना म्हणाव आता देशाचं काम करा. अर्थमंत्री निर्मला बाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचं महत्व सांगतात. राजनाथ सिंह देशाचे संरक्षण मंत्री आहेत. देशाच्या संरक्षणाची बोंब पण धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी पुढे आले. रस्तामंत्री इथेनॉलवर बोलतात हा विषय पुढे नक्की आहे. मोदीजींना मला सांगायचं आहे, तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना तुम्हाला जितक्या यातना झाल्या, त्यापेक्षा जास्त यातना आपण आता ज्यांना श्रद्धांजली वाहिली, त्या मुलांनी जीवन संपवलं, तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना झाला.

ही ठिणगी आता पडली आहे. देशभर वणवा पेटला आहे. लगेच आम्हाला विचारतायत निवडणुकीला तीन वर्ष आहेत. निवडणूका गेल्या खड्डयात. कारण मोदीजींनी पाहिलं की मत चोरी करता येते पण माणसं चोरता येत नाहीत. मन चोरता येत नाहीत. मन आता पेटेलली आहेत, पिसाळलेली आहेत. ही ठिणगी आपल्याला पेटती ठेवायची आहे. सोशल मिडियावर भोंदूत्व स्वीकारणारे हे अंधबक्त मुलांना धमक्या देत आहेत. त्यांचे व्हिडिओ पोस्ट करा. जिथे सापडतील, तिथे त्यांना हिंदुत्व, राष्ट्रभक्ती शिकवा. कधी, कधी शब्दापेक्षा कृती जास्त महत्वाची ठरते. तुमची शक्ती, एकजुटीची नोंद सुवर्णअक्षरांनी आपल्या देशाच्या इतिहासात नोंदवली जाईल. मी तुम्हाला वंदन करतो. आता आलेली जाग कायम ठेवायची आहे. देशाची शक्ती काय असते ते दाखवून द्यायची आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us