ठरलं? ठाकरेंचे खासदार फुटल्यावर लागणार मोठी लॉटरी? केंद्रात थेट…खळबळ उडवून देणारी माहिती समोर!

ही संभाव्य फूट टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आपल्या सर्व खासदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला एकूण 4 खासदार हे उपस्थित होते. तर संजय राऊत यांच्या दाव्यानुसार एकूण पाच खासदार हे ऑनलाईन पद्धतीने बैठकीला उपस्थित होते.

ठरलं? ठाकरेंचे खासदार फुटल्यावर लागणार मोठी लॉटरी? केंद्रात थेट...खळबळ उडवून देणारी माहिती समोर!
uddhav thackeray and ubt mp revolt
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 15, 2026 | 5:01 PM

Uddhav Thackeray UBT MP Revolt : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार लवकरच फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या पक्षफुटीबद्दल चर्चा होत आहे. शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून ऑपरेशन टायगर राबवले जात आहे, असा दावाही केला जात आहे. असे असतानाच आता ठाकरे यांचे काही खासदार थेट वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे काही खासदारांनी शिंदे यांच्या पक्षाचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेटही घेतली आहे. दरम्यान, आता या सर्व घडामोडी घडत असताना बंडखोर खासदारांना नेमकं काय मिळणार? याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

खासदार संजय राऊत हे दिल्लीला जाणार

सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरेंचे काही खासदार हे वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत. लवकरच हे सर्व खासदार वेगळा गट स्थापन केल्याचे पत्रही लोकसभा अध्यक्षांना देण्याची शक्यता आहे. हीच संभाव्य फूट टाळण्यासाठी ठाकरे यांच्या पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत हे दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीच्या दौऱ्यावर जाण्याआधी राऊत यांनी पक्षात कोणतीही फूट पडणार नाही. आम्ही खासदारांच्या संपर्कात आहोत, असे राऊत यांनी सांगितले आहे.

खासदारांना नेमकं काय मिळणार?

ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार जर वेगळा गट स्थापन करणार असतील तर ते सत्तेत सहभागी होणार का? त्यांना नेमके काय मिळणार? याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे यांच्या पक्षाचा वेगळा गट स्थापन केल्यास या गटाला एक मंत्रिपद मिळू शकते. हे मंत्रिपद नेमके कोणते असेल, ते अद्याप समोर आलेले नाही.

बैठक आयोजित केली होती, पण…

दरम्यान, ही संभाव्य फूट टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आपल्या सर्व खासदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला एकूण 4 खासदार हे उपस्थित होते. तर संजय राऊत यांच्या दाव्यानुसार एकूण पाच खासदार हे ऑनलाईन पद्धतीने बैठकीला उपस्थित होते.

Follow Us