कोरोनावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण; भारती पवारांची राज्य सरकारवर टीका, तर कोरोना केंद्राला घाबरतो का? मलिकांचा सवाल

| Updated on: Jan 04, 2022 | 9:48 PM

कोरोनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, असा सामना सुरु होताना दिसतोय. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकार संथ गतीनं काम करत असल्याची टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केलीये.

कोरोनावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण; भारती पवारांची राज्य सरकारवर टीका, तर कोरोना केंद्राला घाबरतो का? मलिकांचा सवाल
Follow us on

नवी दिल्ली : कोरोनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, असा सामना सुरु होताना दिसतोय. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकार संथ गतीनं काम करत असल्याची टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केलीये. भारती पवारांनी, राज्य सरकारकडून होणाऱ्या खर्चावरही बोट ठेवलंय. केंद्र सरकारकडून राज्यांना 23 हजार कोटींची मदत दिली आहे.पण निधी देऊनही महाराष्ट्र सरकारकडून खर्च होत नसल्याचा आरोप भारती पवार यांनी केला आहे.

मलिकांचा केंद्रावर निशाणा

या वादात आता नवाब मलिकांनी देखील उडी घेतली आहे. मलिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाहांच्या उत्तर प्रदेशातल्या सभांवर सवाल उपस्थित केलाय. हजारो लोकांच्या सभा मोदी-शाह घेत आहेत, कोरोना भाजपला घाबरतो का ?, असं टीकास्त्र मलिकांनी सोडलंय. खरं तर गर्दी टाळायलाच हवी, हे केंद्र सरकारची गाईडलाईनही हेच सांगते. त्यामुळे येणाऱ्या काळात गर्दी  वाढवणारे कार्यक्रम टाळले जातील हीच अपेक्षा

राज्यात ओमिक्रॉनचे 75 नवे रुग्ण

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. तर दुसरीकडे ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. राज्यात आज 75 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 40 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. आजच्या 75 रुग्णांसह राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 653 वर पोहोचली आहे.

कोणत्या शहरात ओमिक्रॉनचे किती रुग्ण?

मुंबई – 408
पुणे शहर – 71
पुणे ग्रामीण _ 26
पिंपरी-चिंचवड – 38
ठाणे – 22
पनवेल – 16
नागपूर – 13
नवी मुंबई – 10
सातारा – 8
कल्याण-डोंबिवली – 7
उस्मानाबाद, कोल्हापूर – 5
वसई विरार – 4
नांदेड, भिवंडी – 3
औरंगाबाद, बुलडाणा, मीरा भाईंदर, सांगली – 2
लातूर, अहमदनगर, अकोला, रायगड, उल्हासनगर, अमरावती – 1

संबंधित बातम्या

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात 18 हजारापेक्षा अधिक रुग्ण, 20 जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update | मुंबईत महाभयंकर रुग्णवाढ, नवे रुग्ण 10 हजाराच्या पार, मुंबईचे आकडे धडकी भरवणारे!

राज ठाकरे यांच्याकडून आगामी 10 दिवसांमधील कार्यक्रम रद्द, सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना