राज ठाकरे यांच्याकडून आगामी 10 दिवसांमधील कार्यक्रम रद्द, सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना

राज ठाकरे यांच्याकडून आगामी 10 दिवसांमधील कार्यक्रम रद्द, सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना
Raj Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 04, 2022 | 2:25 PM

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. राज ठाकरेंनी खबरदारी म्हणून आगामी दहा दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती आहे. ‘शिवतीर्थ’ येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची आज कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी येणे अपेक्षित आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी पुढील काही दिवसांच्या त्यांच्या भेटी रद्द केल्या आहेत.

एकाला कोरोना, शिवतीर्थ येथे काम करणाऱ्या सर्वांची चाचणी

राज  ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर तातडीनं इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आहे. या सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी आहे.  कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल आज किंवा उद्या सकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे.

राज ठाकरेंकडून कार्यक्रम रद्द

सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून पुढील 10 दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या सर्व भेटी रद्द केल्या आहेत, अशी माहिती आहे.

राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातील 10 मंत्री आणि 20 नेत्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. त्यानंतरही या मालिकेत वाढ होत आहे. आज मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर, राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

मुंबईत 20 हजार रुग्ण सापडल्यानंतर लॉकडाऊन

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल  यांनी मुंबईतील वाढत्या कोरोना  रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन   मोठं वक्तव्य केलं आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांची दिवसभरातील संख्या 20 हजारांच्यावर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन करावाचं लागेल, असं इकबाल चहल यांनी सांगितलं. एनडीटीव्ही या खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

इतर बातम्या: 

PHOTO: रोहित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत अनेकजण कोरोनाच्या विळख्यात; आज कोरोनाची लागण झालेले नेते कोण?

BMC : दहावीचं वर्ष संपताना टॅब खरेदीचा प्रस्ताव, मुंबई महापालिकेचा 39 कोटींचा खर्च नेमका कुणाच्या फायद्याचा?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें