बारमध्ये शिरला, ना पैसे चोरले, ना दारुची बॉटल…; चोराचा Video पाहून डोक्यावर हात माराल
डोंबिवलीतील केळकर रोडवरील एका बारमध्ये अजब घटना घडली आहे. ही संपूर्ण चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दारु प्यायल्यानंतर होणारी नशात डोक्यात गेली की कोण काय करेल, याचा काही नेमच राहिलेला नाही. त्यातच चोर हा दारुडा व्यक्ती असेल तर मग काही बोलायलाच नको. अनेकदा आपण सोन्या-चांदीचे दागिने, महागडे मोबाईल किंवा रोख रक्कम चोरी झाल्याचे ऐकतो. पण डोंबिवलीत एक अशी विचित्र चोरी झाली आहे, जी पाहून पोलीस आणि हॉटेल मालकही चक्रावून गेले आहेत. डोंबिवलीत एका तळीरामाने चक्क बारमधील दारु मोजण्याचे मापच खिशात टाकल्याने आता बार मालकासह पोलीसही बुचकळ्यात पडले आहेत. या अजब चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओत नेमकं काय?
डोंबिवली पूर्व भागातील केळकर रोडवर गुरुदेव रेस्टॉरंट अँड बार आहे. या हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे ग्राहकांची वर्दळ होती. यादरम्यान एक ग्राहक मद्यपान करण्यासाठी बारमध्ये आला. तो आणि त्याचा मित्र यांनी एकत्र बसून मनसोक्त दारू प्यायला. यानंतर ते दोघेही दारुच्या नशेत बिल भरण्यासाठी काऊंटरवर गेले. त्याचा मित्र बिल भरत असताना या ग्राहकाच्या डोक्यात एक अजब विचार आला आणि त्याने सर्वांच्या समोर मोठ्या हुशारीने हातसफाई केली. याचा एक व्हिडीओही समोर आला.
सावज टिपलं अन् खिशात टाकलं
या बारच्या सीसीटीव्ही फुटेज सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते दोघेही दारु प्यायल्यानंतर बिल काऊंटरवर गेले आणि तिथे बिल भरत असल्याचे दिसत आहे. यावेळी चोरी करणारा चोराने आधी आधी काउंटरवरील कर्मचाऱ्याला बिलाचे पैसे दिले. बारमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी हा त्यांना उरलेले पैसे परत देण्यात व्यस्त होता. तेव्हा त्या चोरट्याची नजर काउंटरवर असलेल्या स्टीलच्या मापावर गेली. यावेळी त्याने आधी ते हातात घेतले. त्यानंतर कोणाचेही लक्ष नसल्याची खात्री पटताच त्याने अत्यंत हुशारीने ते माप उचलले आणि सरळ आपल्या खिशात टाकले. विशेष म्हणजे, ही चोरी करताना त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती. यानंतर त्याने शिल्लक पैसे परत घेतले आणि तो अत्यंत शांतपणे बारमधून बाहेर पडला.
या नंतर हॉटेल व्यवस्थापनाच्या जेव्हा ही बाब लक्षात आली, तेव्हा त्यांनी सीसीटीव्हीची तपासणी केली. तेव्हा हा सर्व प्रकार पाहून हॉटेलमधील कर्मचारीही अवाक् झाले. त्या दारुड्याने बारामध्ये पैसे किंवा दारु न चोरता थेट मापच लंपास केल्याने यावर आता नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. भावा, नक्की काय प्यायला होतास? असा प्रश्नही अनेकांनी या चोरट्याला विचारला आहे. सध्या हॉटेल प्रशासनाकडून या संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. तसेच या अनोख्या चोरीची डोंबिवलीत जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,

