हाता तोंडाशी आलेला घास हिरवला, शेतकरी हवालदिल, महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा धुमाकूळ

| Updated on: Apr 12, 2024 | 10:31 PM

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यावर्षी रब्बी हंगाम उशिरा सुरू झाल्याने काढणीवर आलेल्या पिकांचं यात नुकसान झालं आहे. यामध्ये सर्वाधिक केळी आणि पपईच्या पिकांचं नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हाता तोंडाशी आलेला घास हिरवला, शेतकरी हवालदिल, महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा धुमाकूळ
हाता तोंडाशी आलेला घास हिरवला, शेतकरी हवालदिल, महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा धुमाकूळ
Follow us on

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सातत्याने अवकाळी पाऊस पडतोय. काही ठिकाणी गारपीटदेखील पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अवकाळी पावसामुळे हवालदिल झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या फटका शेती पिकांना बसला आहे. शहादा तालुक्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेती पिकांसोबतच घरांची देखील पडझड झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजानुसार, आज सायंकाळी शहादा तालुका आणि परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यावर्षी रब्बी हंगाम उशिरा सुरू झाल्याने काढणीवर आलेल्या पिकांचं यात नुकसान झालं आहे. यामध्ये सर्वाधिक केळी आणि पपईच्या पिकांचं नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यासह विदर्भ सीमेवर अनेक भागात अवकाळी पाऊस पडला. जालना जिल्ह्यात या आठवड्यात सारखा अवकाळी पाऊस पडताना दिसतोय. मंठा तालुक्यतील उस्वद गावात वादळी वाऱ्यामुळे गावातील शाळा आणि घरावरची पत्रे उडून गेली. अचानक झालेल्या या पावसामुळे फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

जळगावच्या अमळनेरमध्ये मुसळदार पाऊस आणि गारपीट

जळगावच्या अमळनेर मध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अमळनेर शहरासह तालुक्यात विविध गावांमध्ये तब्बल अर्धा तास वादळी वारा, गारपीटसह मुसळधार पाऊस पडला. अमळनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिट यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

वाशिममध्ये सलग चौथ्या दिवशी गारपीट

वाशिम हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सलग चौथ्या दिवशीही वाशिम जिल्ह्यात वादळी वारासह विजेच्या कडकडाटात गारपीट झाल्याचं आज पुन्हा पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकची भर पडली आहे. भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस बरसात असल्याने उन्हाळी पिकासह फळबागांना या पावसाने अधिकचा फटका बसताना दिसतोय.

बीडमध्ये गारांचा पाऊस

बीडमध्ये आज दुसऱ्या दिवशीही गारांचा पाऊस पडला. बीडमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. या गारपिटीत शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. वडवणी तालुक्यातील कवडगाव, मोरेवाडी, देवडी, पिंपरखेड, साळींबा या गावात आज पुन्हा गारांचा पाऊस पडला.

बुलढाण्यात तिसऱ्या दिवशी गारपीट

बुलढाणा जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि प्रचंड गारपीटही झाली. त्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडाली. शेतातील उभ्या पिकांचे सुद्धा नुकसान झाले. यामध्ये मका, ज्वारी, कांदा, भाजीपाला सह इतर पिकांचे नुकसान झाले.