अवकाळी पावसामुळे पिकांसोबतच फळबागांचीदेखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले टरबूज आणि खरबूजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकरी चिंतेत सापडला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पपईचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते मात्र अवकाळी पावसामुळे पपई पीकही भूईसपाट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवडही मोठ्या प्रमाणात केली होती. मका विकून दोन पैसे हातात येतील अशी परिस्थिती असताना अवकाळी पावसाने मात्र उभा असलेल्या पिकाला आडवे केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवडही मोठ्या प्रमाणात केली होती. मका विकून दोन पैसे हातात येतील अशी परिस्थिती असताना अवकाळी पावसाने मात्र उभा असलेल्या पिकाला आडवे केले आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास वाया गेला आहे.हरभरा पीक काढण्याची तयारीत असतानाच अवकाळीन पावसामुळे हे पीक आता भूईसपाट झाले आहे.

काढणीला आलेला गहू अवकाळी पावसाच्या तडाक्यात सापडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आता ना पीक आहे ना पैसा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सरकारने अवकाळी पावसात नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.