
भिवंडीत रात्र निवारा केंद्रातील बेघरांचे लसीकरण करण्यात आलं. महानगरपालिका क्षेत्रात दिवानशाह दर्गा व बस स्थानक परिसरात दोन रात्र निवारा केंद्र आहेत. या केंद्रांच्या आश्रयास असलेल्या बेघर निराधार व्यक्तींचे लसीकरण होतं.

महापालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. आर. खरात यांनी स्वतः दोन्ही केंद्रातील बेघर निराधार व्यक्तीं साठी लसीकरण मोहीम राबविली.

राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियान (National urban Livelihood mission) अंतर्गत भिवंडी शहरात दोन बेघर निवारा केंद्र कार्यरत आहेत.

याठिकाणी वास्तव्यास असलेले बेघर निराधार अशा तब्बल 80 व्यक्तींचे लसीकरण विशेष मोहिमे अंतर्गत करण्यात आले .

या मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पालिका आरोग्य यंत्रणा पोहचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.