Vaishnavi Hagawane Death Case: निर्दयी नवऱ्यासाठी वैष्णवीने घेतलेला उखाणा, Video पाहून म्हणाल…

Vaishnavi Hagawane Death Case: 'शशांक रावांना आवडतं...', लग्नात आनंदी असणाऱ्या वैष्णवीला कुठे माहिती होतं तिचा असा घात होईल, लग्नात निर्दयी नवऱ्यासाठी वैष्णवीने घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ पाहून म्हणाल...

Vaishnavi Hagawane Death Case: निर्दयी नवऱ्यासाठी वैष्णवीने घेतलेला उखाणा, Video पाहून म्हणाल...
वैष्णवी हगवणे
Updated on: May 29, 2025 | 10:43 AM

Vaishnavi Hagawane Death Case: वयाच्या 23 व्या वर्षी वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरु आहे. कोर्टात हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीचं एका अज्ञात व्यक्तीसोहबत चॅटिंग सुरू होतं, तिचे नको त्या व्यक्तीशी संबंध होते असा दावा केला आहे. तर वैष्णवी हिच्या कुटुंबियांनी सर्व आरोप फेटाळले आहे. स्वतःच्या चुकांवर पांघरुण घालण्यासाठी हगवणे कुटुंबिया वैष्णवीच्या चारित्र्यावर संशाय घेत आहे.. असं देखील सांगितलं जात आहे.

दरम्यान, वैष्णवीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वैष्णवीच्या लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वैष्णवी लग्नाच्या दिवशी नवरा शशांक याच्यासाठी उखाणा घेताना दिसत आहे.

 

 

लग्नात उखाणा घेण्याची एक रीत आहे. वैष्णवी उखाणा घेत म्हणाली, ‘चंदेरी थाळी, सोनेरी मटण…शशांक रावांना आवडतं चिकन आणि मटन…’ सध्या वैष्णवी हिने घेतलेला उखाणा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत वैष्णवी हिला श्रद्धांजली वाहत आहेत तर, हगवणे कुटुंबियांवर संताप व्यक्त करत आहेत.

वैष्णवी हिच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. हगवणे कुटुंबियांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. वैष्णवी हिच्या मृत्यूनंतर सासू, नणंद, नवरा, सासरे आणि दीर यांना अटक करण्यात आली आहे. आता वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंद यांची पोलीस कोठडी 1 दिवसाची वाठ करण्यात आली आहे. तर दीर आणि सासऱ्याची पोलीस कोठडी 31 मे पर्यंत वाढवण्यात आली. तर अन्य आरोपी निलेश चव्हाण याच्या शोधासाठी पोलीसांची 6 पथकं पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

वैष्णवी हगवणे हिच्या शरीरावर जखमा

वैष्णवी हिच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी आढळून आल्या. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे एकूण 29 व्रण असल्याचं समोर आलं, त्यातील 5 ते 6 व्रण ताजे असल्याचे उघड झालं आहे. शिवाय वैष्णवीच्या हिच्या वडिलांनी देखील लेकीच्या शरीरावर जखमा होत्या असं सांगितलं आहे. सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.