Valmik Karad : वाल्मिक कराडाच्या अडचणी वाढल्या, खळबळजनक माहिती समोर

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड हा सध्या जेलमध्ये आहे. दरम्यान आता त्याच्या अडचणी आणखी वाढल्या असून, मोठी बातमी समोर येत आहे.

Valmik Karad : वाल्मिक कराडाच्या अडचणी वाढल्या, खळबळजनक माहिती समोर
Valmik Karad
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 18, 2026 | 4:48 PM

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजलं, संतोष देमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पहायला मिळाली, दरम्यान या प्रकरणात सध्या वाल्मिक कराड हा जेलमध्ये आहे. कराड संदर्भात एक मोठी बातमी समोर येत असून, त्यामुळे आता त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा देखील वाल्मिक कराडवर आरोप आहे. या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा गोपनीय जबाब नोंदवण्यात आला आहे.  विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा जबाब या प्रकरणात आता महत्त्वाचा ठरणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजयसिंह यांनी 164 नुसार दिलेल्या जबाबामध्ये या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यासह त्याच्या मुलाचं देखील नाव घेतलं आहे.

बीड जिल्ह्यातल्या परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती, त्यांच्या हत्या प्रकरणाला आता दोन वर्ष उलटून गेले आहेत. या प्रकरणात महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा देखील जबाब नोंदवण्यात आला आहे.  164 नुसार विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा जबाब या प्रकरणात महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बांगर यांनी या प्रकरणात दिलेल्या जबाबामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचं देखील नाव घेतल्याची माहिती समोर येत आहे.  यामुळे हा जबाब देखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, यामुळे आता वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान   आजच या प्रकरणातील दोन संशयितांची नार्को टेस्ट देखील होत आहे. यातून आता एसआयटीच्या हाती नेमकं काय लागतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या वाल्मिक कराड हा संतोष देमुख हत्या प्रकरणात जेलमध्ये आहे. त्यानंतर आता या प्रकरणात देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us