
महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त (shivjayanti 2023) चित्रकलेचा छंद जोपासणारी पायल संतोष पवार (payal pawar) यांनी अनोखे चित्र घराच्या भिंतीवर रेखाटले आहे. यामध्ये पायलने घराच्या टेरेसवर 10 बाय 10 च्या भिंतीवर शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटले आहे. यासाठी सुमारे 6 तास उन्हात उभे राहून पायलने हे चित्र रेखाटून अभिवादन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर व प्रेम असणारी तसेच कला क्षेत्राची प्रचंड आवड असणारी सिंधुदुर्ग दोडामार्गची कन्या स्पृहा सुमित दळवी वय वर्षे ५ हिने शिवजयंतीचे औचित्य साधुन दिलेली ही शिवगर्जना अतिशय प्रेरणादायी आहे. तिच्या या शिवगर्जनेमुळे बऱ्याच जणांकडून तिला कौतुकाची थाप मिळाली आहे. तर स्पृहा वल्ड या चॅनेलद्वारे ती आपले व्हिडीओ प्रसारित करत असते, लघुचित्रपटामध्ये तसेच नाटकामध्ये सुद्धा तिने काम केले आहे.
कल्याणमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने “जय शिवराय ” या शब्दाच्या आकाराची 4 फूट बाय 40 फूट या मापाची पुस्तक मांडणी तयार करण्यात आली आहे. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष रुपेश रविंद गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला असून ,शहरातील नागरिकांना या मांडणी मध्ये पुस्तके दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जमा झालेली सर्व पुस्तके ही नंतर शहरातील गरजू शाळांना देण्यात येणार आहेत. सदर उपक्रमाची नोंद अनेक बुक्स ऑफ रेकोर्ड मध्ये होणार आहे, स्वराज्याची संकल्पना मांडणारे राजे शिव छत्रपती यांना अनोख्या पध्दतीने मुजरा करण्याच्या हा संकल्पनेचा सर्वत कौतुक होत आहे
बुलढाणा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करता यावी, शिवजयंती दरम्यान शांतता अबाधित राहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टिकोनातून मलकापूर पोलिसांनी शहरातून रूट मार्च करत अनुचित परिस्थिती निर्माण झाल्यास जमावाला रोखण्यासाठीचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने सातारा शहरात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मित्र परिवाराच्या वतीने सलग चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल या ठिकाणी इतिहास आणि ब्रिटिशकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या प्रदर्शनात शिवकाळात वापरण्यात येणारी अनेक दुर्मिळ शस्त्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यंदा जयंतीनिमित्त परदेशी कलाकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. बीडच्या छत्रपती संभाजीराजे मैदानावर कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
पुण्याच्या भोरमध्ये शिवजयंतीची तयारी, वेगवेगळ्या आकाराच्या भगव्या झेंड्यांनी बाजारपेठ सजली आहे. मूर्तीकारांची मूर्ती रंगविण्याची लगबग, शिवरायांच्या आकर्षक, सुबक 1 ते 4 फुटांपर्यंत उंची असणाऱ्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत.
शिवजयंतीउत्सवा निमित्त पुण्याच्या भोरमध्ये, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत. यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद,सह विविध जिल्ह्यातील 110 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. शिवतेज युवा प्रतिष्ठान कडून ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
धुळे शहर शिवजयंती निमित्ताने भगवामय झाला आहे .धुळे शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती ही दरवर्षी साजरी करण्यात येत असते. यावर्षी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागात भगवी झेंडा लावण्यात आले असून अनेक भागात विद्युत रोशनी करण्यात आली आहे. शहरात सुमारे 50 च्या वर मिरवणुका या शिवजयंतीनिमित्त निघत असतात. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध भागात झेंडे आणि विद्युत रोषणाईने वातावरण भगवामय झाला आहे
शहरातील शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने तीन दिवसीय व्याख्यानमालेचा आयोजन करण्यात येत असत, या वर्षी देखील नॉर्थ पॉईंट इंग्लिश स्कूल च्या मैदानावर शिवचरित्र व्याख्यान मालाचा आयोजन करण्यात आला आहे .यात महाराष्ट्रातील प्रख्यात व्याख्याते हे हजेरी लावणार आहेत यात प्रामुख्याने विकास नवाळे विक्रम कदम श्रीमंत कोकाटे यांची व्याख्याने होणार आहेत दिनांक 17 पासून तीन दिवस ही व्याख्यानमाला सुरू राहणार असून पहिल्या दिवशी हजारो शिवभक्तांनी व्याख्यानमाला ऐकण्यासाठी गर्दी केली होती.