ज्या दिवशी वसंत मोरे लोकसभेच्या रिंगणात उतरणार त्या दिवशी… पुण्यात काय घडणार वसंत मोरे यांनी सांगितले

| Updated on: Mar 19, 2024 | 12:35 PM

Pune lok sabha election 2024 vasant more murlidhar mohol| पुणे लोकसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले. त्यासाठीच आपण मनसेतून बाहेर पडलो आहे. ज्या दिवशी मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, त्या दिवशी पुणे शहरातील चित्र बदलले असणार आहे.

ज्या दिवशी वसंत मोरे लोकसभेच्या रिंगणात उतरणार त्या दिवशी... पुण्यात काय घडणार वसंत मोरे यांनी सांगितले
vasant more murlidhar mohol
Follow us on

पुणे | 19 मार्च 2024 : लोकसभेच्या रणधुळीत सर्वाधिक चर्चा सध्या पुणे जिल्ह्याची सुरु आहे. पुणे जिल्हा पवार कुटुंबियांमुळे चर्चेत आला आहे. बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची लढत रंगणार आहे. यामुळे या मतदार संघाची चर्चा होत आहे. परंतु पुणे लोकसभा मतदार संघही चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारे वसंत मोरे पुणे लोकसभेसाठी मैदानात उतरणार आहे. लोकसभेचे मैदान गाजवण्याचा त्यांनी निर्णय घेतला असला तरी अद्याप पक्ष की अपक्ष हा निर्णय झाला नाही. परंतु आपण ज्या दिवशी मैदानात उतरु, त्या दिवशी पुणे लोकसभेचे चित्र बदलणार आहे. ही लढत एकतर्फी होईल, असा दावा वसंत मोरे यांनी करताना आपला विजय निश्चित असल्याचे म्हटले.

पुणे लोकसभा एकतर्फी होणार

पुणे लोकसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले. त्यासाठीच आपण मनसेतून बाहेर पडलो आहे. ज्या दिवशी मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, त्या दिवशी पुणे शहरातील चित्र बदलले असणार आहे. त्यानंतर ही निवडणूक एकतर्फी कशी होईल, हे तुम्हाला दिसणार आहे, असे वसंत मोरे यांनी सांगितले.

योग्य वेळी योग्य निर्णय

भाजप उमेदवार मुरलधीर मोहोळ यांचा प्रचार सुरु झाला आहे. आपली अजून काहीच तयारी नाही? असा प्रश्न वसंत मोरे यांना विचारला. त्यावर वसंत मोरे म्हणाले, योग्य वेळी योग्य निर्णय आपण जाहीर करणार आहोत. मला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही तरी मी निवडणूक लढणार आहे. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढलो तरी पहिल्या क्रमांकावर असणार आहे. यापूर्वी मुरलीधर मोहोळ महापौर होते आणि मी विरोधी पक्षनेता होतो. ज्या ज्या वेळी संघर्ष त्या त्या वेळी विजय मिळवला.

हे सुद्धा वाचा

चंद्रकांत पाटील म्हणतात, ही लढत एकतर्फी होईल. परंतु चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे मला भाजपची ऑफर दिली होती. भाजपमध्ये या तुम्हाला निवडून आणू, असे जाहीर कार्यक्रमात चंद्रकांत पाटील म्हणाले होते, याची आठवण त्यांनी करुन दिली. आपण मनसे आणि भाजप युती, राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासंदर्भात काहीच बोलणार नाही, असे वसंत मोरे यांनी म्हटले.

मुरलीधर मोहोळ यांची आघाडी

पुण्याचे भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी निवडणूक प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. कार्यालयाच्या बाहेर महायुतीच्या सर्व नेत्यांचे कटाऊट्स, झेंडे आणि पक्ष चिन्ह लावले आहेत. मोहोळ यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे.