जेजुरीच्या लहानग्या शुभमने विद्यानंद बापटांना सांगितला भक्तीचा महिमा..

जेजुरीचा शुभम वाघरी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शुभम वाघरी याचा विद्यानंद बापट यांच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. शुभम वाघरी याच्यासोबत थेट विद्यानंद बापट दिसत आहेत.

जेजुरीच्या लहानग्या शुभमने विद्यानंद बापटांना सांगितला भक्तीचा महिमा..
Vidyanand Bapat
| Edited By: | Updated on: Oct 04, 2026 | 2:34 PM

आपल्या खास आवाजातून नवविवाहित जोडप्यांना शुभेच्छा देत सोशल मीडियावर लोकप्रिय झालेला जेजुरीचा शुभम वाघरी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शुभम वाघरी याचा विद्यानंद बापट यांच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. शुभम वाघरी आपल्या खास शैलीत आणि आवाजात नवविवाहित जोडप्यांना शुभेच्छा देतो. त्याच्या या अनोख्या अंदाजामुळे तो सोशल मीडियावर अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या तब्बल चार लाखांवर पोहोचली आहे. लहान वयात गरीबी काय शिकवू शकते, हा शुभमच्या वागण्यातून कळते.

त्यातच विद्यानंद बापट यांना थेट देवाची महती समजून सांगताना शुभव वाघरी हा चिमुकला दिसतोय. तोच व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शुभम वाघरी म्हणतो की, नमस्कार, येळकोट येळकोट जय मल्हार. आज आपल्या सोबत बापट सर आहेत. देवाची भक्ती केल्याबद्दल असं असतं… देवाची भक्ती केल्यानंतर आपल्याला सगळं भेटतं, हे देवच शिकवतो… या संवादादरम्यान शुभम आणि विद्यानंद बापट एकमेकांकडे पाहताना दिसतात.

Loading...

शुभमच्या बोलण्याची खास लकब, आवाजातील आपलेपणा आणि साध्या भाषेतून दिला जाणारा संदेश यामुळे तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडताना दिसत आहे. काही तासातच हा व्हिडीओ व्हायरल होत असून यावर धमाकेदार कमेंट केल्या जात आहेत.

जेजुरी येथून शुभम वाघरीने आपल्या वेगळ्या शैलीच्या माध्यमातून सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता विद्यानंद बापट यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शुभम पुन्हा चर्चेत आला आहे. थेट देवा काय आणि काय नाही देव आपल्याला काय काय देतो, हे व्हिडीओमध्ये सांगताना शुभम वाघरी दिसत आहे. शुभम हा सोशल मीडियावरील तूफान चर्चेत असलेले नाव आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us