AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ढगफुटी सदृश पाऊस, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पुढे, वर्ध्यातील..

राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आज पावसाचा मोठा इशारा दिला. अनेक भागात पूर आलेत. यादरम्यानच एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओत ढगफुटी सदश्य परिस्थिती निर्माण झाली.

ढगफुटी सदृश पाऊस, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पुढे, वर्ध्यातील..
Warud Bagaji Dam in Wardha
| Updated on: Jul 31, 2026 | 3:08 PM
Share

राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला. धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली. पूरस्थिती निर्माण झाली. अनेक पूल पाण्यासाली गेलेत. विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज काही भागात अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला. यादरम्यानच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ढगफुटीसारखा पाऊस होताना दिसत आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. वर्धा येथील पुलगाव जवळील वरूड बगाजी डॅम परिसरातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. वरूड बगाजी डॅम येथे ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. थेट ढगफुटीसारखा पाऊस कोसळताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ढगखाली येत आहेत. जोराचा वारा सुटला आहे. यादरम्यान काळोखा झाला. प्रचंड वारा आणि पाऊस दिसत आहे. वरूड बगाजी डॅमवर ढगफुटी सदश्य परिस्थिती बघायला मिळाली. अचानक एकाच वेळी अतिपाऊस दिसत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात आज पावसाचा इशारा देण्यात आला. यासोबतच अतिवृष्टीचा इशारा आहे.

राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. नाशिक, यवतमाळ आणि अमरावतीमध्ये रेड अलर्ट देण्यात आला. त्यातच वरूड बगाजी डॅम येथे ढगफुटी सदृश पाऊस झाला. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली. ज्यावेळी ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यावेळी डॅमवर काही लोक उपस्थित होते. त्यांनीच हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला.

वाशिम, वर्धा, अमरावती, यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रभर झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक नदी नाल्यांना पूर आला. त्यामुळे काही ठिकाणी रस्ते खचले तर काही मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेत. त्यामध्ये मालेगाव तालुक्यातील वाघळूद ते हिवरा रस्त्यावरील पूल वाहून गेलाय तर रिसोड तालुक्यातील पारडी ते बेलखेडा रस्ता काही काळ बंद झाला होता. अनेक पूल पाण्याखाली गेली आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा