ट्रेन पकडतांना आईचा तोल गेला, मुलीने किंचाळी ठोकली, नंतर जे घडलं ते पाहून अंगावर काटाच येईल, CCTV

| Updated on: Jan 04, 2023 | 5:35 PM

पुण्यातील रेल्वे स्थानकावरील एका अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. आरपीएएफ जवानाने केलेल्या मदतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

ट्रेन पकडतांना आईचा तोल गेला, मुलीने किंचाळी ठोकली, नंतर जे घडलं ते पाहून अंगावर काटाच येईल, CCTV
Image Credit source: Google
Follow us on

अभिजीत पोते, टीव्ही 9 मराठी, पुणे : पुण्यातील रेल्वेस्थानकावरील एक सिसिटीव्ही व्हायरल झाले आहे. हे थरारक सीसीटीव्ही अक्षरशः अंगावर काटा आणणारे आहे. 1 जानेवारीचा संपूर्ण प्रसंग आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर महिलेचा जवानाने जीव वाचवल्याचे यामध्ये दिसून येत आहे. जवानाच्या मदतीने महिलेचे प्राण वाचले असून मोठी हानी टळली आहे. सकाळी सात वाजेच्या दरम्यान एक महिला आपल्या मुलीला घेऊन रेल्वे स्थानकावर आली होती. पण ज्या ट्रेनने महिलेला जायचे होते ती ट्रेन नुकतीच निघाली होती. घाईगडबडीत आलेली महिला आणि तीची मुलगी रेल्वे पकडण्यासाठी धावत होते. महिलेने मुलीला ट्रेनमध्ये बसवलं होतं. त्याच दरम्यान महिलेने आपल्याकडे असलेल्या बॅगाही आतमध्ये धावत असतांना टाकल्या होत्या. महिला धावत्या ट्रेनमध्ये उडी मारून बसणार त्याचवेळी महिलेचा पाय निसटून तोल गेला. यावेळी महिलेने ट्रेनला घट्ट धरून ठेवले होते. पण यावेळी महिलेचा पाय हा खाली अडकला होता. त्याच दरम्यान ट्रेनमध्ये बसलेल्या मुलीने जोरात किंचाळी ठोकली आणि आजूबाजूला असलेले प्रवासी आणि आरपीएफचे जवान गोळा झाले.

धावत्या ट्रेनमधून महिलेला बाहेर काढणे तसे कठीणच होते, पण याच वेळी आरपीएफ जवान विनोद मीना यांनी महिलेला बाहेर ओढण्यास यशस्वी ठरले.

हे सुद्धा वाचा

स्टेशनवरील हा प्रसंग चालकाच्या लक्षात येताच त्यांनी ही ट्रेनही थांबविली. याच दरम्यान महिलेच्या पायला किरकोळ दुखापत झाली होती.

मुंबईच्या दिशेने सकाळच्या वेळेला प्रस्थान करणाऱ्या प्रगती एक्सप्रेस धावत असतांना हा अपघात घडला असून आरपीएफ जवानाने प्रसंगावधान दाखवून महिलेचा जीव वाचविला आहे.

महिलेचा जीव वाचविल्यानंतर आरपीएफ जवान विनोद मीना यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मात्र, ट्रेन सुरू झाल्यानंतर ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा जिवावर बेतू शकते हा धडा यानिमित्ताने घ्यायला हवा.