Video : लग्न, संसार म्हणजे नक्की काय असतं?, 79 वर्षाच्या गडाख आजोबांनी दिला नातीला सुखी संसाराचा मंत्र! तरुणाईसाठी मार्गदर्शक

| Updated on: Jan 24, 2022 | 7:17 PM

काही तरुण-तरुणी तर लग्न न करता आयुष्य जगायचा विचार करत आहेत. त्याला काही प्रमाणात समाज आणि समाजातील प्रवृती कारणीभूत असतीलही. मात्र, लग्न, कुटुंबव्यवस्था कशी सुंदर करता येऊ शकते?, नवरा-बायकोचा सुखी संसाराचा गाडा कशाप्रकारे हाकता येऊ शकतो? याचं सुंदर विवेचन यशवंतराव गडाख यांनी आपल्या नातीला केलं आहे.

Video : लग्न, संसार म्हणजे नक्की काय असतं?, 79 वर्षाच्या गडाख आजोबांनी दिला नातीला सुखी संसाराचा मंत्र! तरुणाईसाठी मार्गदर्शक
यशवंतराव गडाख यांचं आपल्या नातीला लग्न व्यवस्थेबाबत मार्गदर्शन
Follow us on

मुंबई : धकाधकीच्या आयुष्यात कुटुंबसंस्था, लग्न, संसार याकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टीकोन काहीसा बदलल्याचा भासतो. काही तरुण-तरुणी तर लग्न न करता आयुष्य जगायचा विचार करत आहेत. त्याला काही प्रमाणात समाज आणि समाजातील प्रवृती कारणीभूत असतीलही. मात्र, लग्न, कुटुंबव्यवस्था कशी सुंदर करता येऊ शकते?, नवरा-बायकोचा सुखी संसाराचा गाडा कशाप्रकारे हाकता येऊ शकतो? याचं सुंदर विवेचन यशवंतराव गडाख (Yashwantrao Gadakh) यांनी आपल्या नातीला केलं आहे. काँग्रेस नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी हा व्हिडीओ ट्वीट केलाय. हा व्हिडीओ समस्त तरुण-तरुणींसाठी मार्गदर्शक असाच आहे.

सत्यजित तांबे यांचे ट्वीट

सत्यजित तांबे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये यशवंतराव गडाख आपली नात रुक्माला लग्न या सामाजिक जीवनातील महत्वाच्या टप्प्याबाबत मार्गदर्शन करताना दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला रुक्मा आपल्या आजोबांना लग्न आणि कुटुंबव्यवस्थेबाबत महत्वाचा प्रश्न विचारते. त्यानंतर गडाख आजोबा आपल्या नातीला सुखी संसाराचा मंत्री देतात.

रुक्माचा आजोबांना प्रश्न –

हे सगळं लग्नाचं हेऊन मला जर कन्फ्युजन होत आहे आप्पासाहेब. मी काय केलं पाहिजे, मला काही समजत नाही, तुम्ही सांगा ना…

गडाख आजोबांचं उत्तर –

‘लग्न हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. ते करावंच लागतं. तुझ्यामध्ये आणि तुझ्या मिस्टरमध्ये Wave length पाहिजे. ती महत्वाची आहे. एकेमकांची Wave Length जुळली पाहिजे. दोघांनी Adjustment केली पाहिजे जगण्याची. नाहीतर मग जग इतकं फास्ट आहे की, त्यामध्ये आपण वाहत जाऊ. आनंद घ्या जगण्याचा, काम करा, फिरा, प्रवास करा, प्रवासातून खूप समजतं. एकमेकाला आपण प्रवासात जाणून घेतो. ज्यावेळी प्रवासाला निघतो, त्यावेळी आपण एकमेकांच्या जवळ येतो. प्रवास करा जग बघा, किती सुंदर जग आहे. निसर्गात जा, निसर्ग बघा…’

‘तू 25 वर्षे या घरात होती. लहानपणी तू माझ्या पाठीवर बसायची गार्डनमध्ये. अशी मला घोडाघोडा करायची. तेव्हा तू खूप चांगली मुलगी आहे. लग्न ही एक Adjustment आहे. तू आता एक घर सोडून दुसऱ्या घरात जाणार आहेस. या घरातील संस्कार, त्या घरातील संस्कार असं दोन्ही मिळून तुला ते मॅच करावं लागेल. स्त्री च्या हातात खूप असतं. स्त्री ही एक शक्ती आहे आणि ती शक्ती ती कशी वापरते यावर अवलंबून आहे. पुरुष हा घरचा पाहुणा असतो, स्त्री प्रमुख आहे. आयुष्य सुंदर करणं आपल्या हातात आहे. नाहीतर मग काय कुढत बसायचं, रडत बसायचं, ते आयुष्य नाही. माणसाचा जन्म हा एकदाच येतो… तो काही परत परत येत नाही. आहे यात सगळी सुखं उपभोगायची, आपली सगळी कर्तव्ये पार पाडायची, असं आयुष्य जगायचं. कोड्यात जगू नका, स्ट्रेट फॉरवर्ड राहा… हे आयुष्य आहे हे आहे. स्वीकारलं आहे ते स्वीकारलं आहे’.

इतर बातम्या :

‘आजोबा… काळजी घ्या’, शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर नातू भावनिक, रोहित आणि पार्थ पवारांचं ट्वीट काय?

चंद्रशेखर बावनकुळे कोरोना पॉझिटिव्ह! पटोलेंविरोधातील आंदोलनात 2 वेळा सहभागी, पोलिसांनीही घेतलं होतं ताब्यात!