Vidyanand Bapat : ऐन गणेशोत्सवात विद्यानंद बापट यांची मोठी मागणी; लाऊडस्पीकरवरून मुंबई हायकोर्ट काय आदेश देणार? नेमकं काय घडलं?

ऐन गणेशोत्सवात विद्यानंद बापट यांनी नवी मोठी मागणी केली आहे. त्यात आता ध्वनी प्रदुषणावरून मुंबई हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.

Vidyanand Bapat : ऐन गणेशोत्सवात विद्यानंद बापट यांची मोठी मागणी; लाऊडस्पीकरवरून मुंबई हायकोर्ट काय आदेश देणार? नेमकं काय घडलं?
vidyandand bapat
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 22, 2026 | 12:52 PM

राज्यातील गणेशोत्सव आणि इतर धार्मिक सोहळ्यात होणाऱ्या ध्वनीप्रदुषणवरून नागरिकांनी काही आठवड्यांपूर्वी आवाज उठवला. विशेष म्हणजे पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारला. राज्यातील काही भागात डिजेवर बंदी देखील घालण्यात आली आहे. त्यानंतर सोमवारी सण-उत्सव काळातील ध्वनी प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली. न्या. जी. एस. कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने ही दखल घेतली. आज या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचिकेवरून कोर्ट कोणता आदेश कोणता देणार. याकडे लक्ष लागलं आहे. याचदरम्यान मुंबई हायकोर्टाच्या सुमोटो याचिकेवरून सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आता थेट खुल्या वातावरणात वाजवण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरवरच बंदीची मागणी केली आहे.

विद्यानंद बापट म्हणाले, ‘लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. देसाई यांच्या 85 सालच्या कमिटीच्या शिफारसीमध्ये ही बाब नमूद आहे. महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही ही बाब नमूद आहे. नंतर फिरवला असेल. खुल्या वातावरणील लाऊडस्पीकरवर बंदी आणली पाहिजे’. दुसरीकडे पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप होत आहे, यावर बापट म्हणाले, पोलिसांनी आधीच दक्षता घेतली पाहिजे. त्यांनी आधीच रोखण्याची योजना आखली पाहिजे. खरंतर ही समस्या मुळापासून सोडवली पाहिजे. खुल्या वातावरणात लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी दिल्यानंतर नैतिक अधिकार फारसा राहत नाही. सणांच्या दिवसात अंमलबजावणीत शिथिलता येते. त्यामुळे पोलिसांनी स्वत:हून कारवाई करणे गरेजेचे आहे.’

पुण्यात पोलिसांचा गणोशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु पोलिसांचा बंदोबस्त असतानाही ध्वनीप्रदुषणावरुन ठोस कारवाई करण्यात येत नसल्याचे बोलले जात आहे. त्यावर बापट म्हणाले, ‘पोलिसांचा बंदोबस्त असनाताही अंमलबजावणी होत नसेल, तर खुल्या वातावरणात लाऊडस्पीकरवर बंदी घातली पाहिजे. एका समाजसुधारकाने म्हटलं की, सणासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करावा लागतो. त्यातून निष्कर्ष काही निघत नाही. मानसिक समाधान फक्त काहींचं होतं. वस्तूनिष्ठ असं काही नाही. लाऊडस्पीकरमुळे सरकारी यंत्रणावर विनाकारण ताण येतो. नागरिकांच्या घरातील महसूलातून चालणाऱ्या यंत्रणेवर ताण येतो. ते स्वत:हून शिस्त पाळत नाही, त्यामुळे या समस्या निर्माण होतात’. तर सार्वजनिक निधीच्या खर्चावर ते म्हणाले की, ‘सणासुदीत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्तामुळे वायफळ खर्च होतो. सार्वजनिक निधीची उधळपट्टी आहे. नागरिकांचा कररुपी पैसा हा उत्सवखोरांकडून वसूल करावेत. या मंडळाकडून वसूल करावेत’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us