पाण्यासाठी पुढाऱ्यांना गावबंदी, गावच्या वेशीवर टांगला बोर्ड, ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन

गावाला पाण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी अखेर आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हे आंदोलन आणि गावात पुढाऱ्यांनी बंदी घालण्याचे...

पाण्यासाठी पुढाऱ्यांना गावबंदी, गावच्या वेशीवर टांगला बोर्ड, ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन
pudhari gav bandi
| Updated on: Nov 22, 2026 | 6:03 PM

लोकशाहीत निषेध व्यक्त करण्याचा अधिकार कायद्याने सर्वांना दिला आहे. राज्यात सध्या पाण्याच्या टंचाईने काहूर माजले आहे. तसेच दुष्काळ परिस्थिती असली. तर सोलापूरातील एका गावात कायमच पाण्यासाठी दाही दिशा करावी लागत आहे. सोलापूरातील या गावातील गावकऱ्यांनी पाणी मिळत नसल्याने त्यांनी पुढाऱ्यांनाच गावबंदी घातली आहे. कोणत्या गावाने हा उपक्रम हाती घेतला आहे, हे आपण वाचूयात…

सोलापूरातील माढा तालुक्यातील जाधववाडी ग्रामस्थांनी पाण्यासाठी अनोखे आंदोलन सुरु केले आहे. या ग्रामस्थांनी गावातील शाळा तसेच सर्व व्यवहार बंद केले आहेत. आणि नेते मंडळींना ही गावातच प्रवेश बंदी घालत. आगामी निवडणुकांवर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.

Loading...

जाधववाडी ग्रामस्थांचे पाण्यासाठी अनोखे आंदोलन

उजनी धरणाचे पाणी कॅनलद्वारे सीना माढा उपसा योजनेच्या माध्यमातून सोडण्यात यावे या मागणीसाठी माढ्याच्या जाधववाडीचे ग्रामस्थ अनेक महिन्यांपासून संघर्ष करीत आहेत.अखेर जाधववाडी गावकऱ्यांनी पाण्यासाठी अनोखे आंदोलन सुरु केले आहे.जोपर्यत ग्रामस्थांना पाणी मिळत नाही तोपर्यत नेते मंडळीना गावबंदी करण्यात आली आहे. याबाबतचा एक फलकच गावात गावकऱ्यांनी लावला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळामध्ये मुलांना न पाठवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असून बाजारपेठेतील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय झाला.आगामी येऊ घातलेल्या निवडणुकांवर बहिष्काराचा निर्णय गावकऱ्यांनी एकत्रितपणे जाहीर केला आहे.पाणी नसल्याने शेतकरीराजा हतबल झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us