Video : Wardha CCTV | वर्ध्यात संगणक, थंब मशीनसह पळविल्या भोजन प्लेट, सिंदीतील चोरटे सीसीटीव्हीत कैद

| Updated on: May 22, 2022 | 12:58 PM

टिळक प्राथमिक शाळेतून विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाच्या 512 प्लेट (ताट) लंपास करण्यात आल्या. तो मुद्देमाल 10 हजार 200 रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही चोऱ्यांमुळे शहरात एकच खळबळ उडाली. सदर चोरीची सिंदी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

Video : Wardha CCTV | वर्ध्यात संगणक, थंब मशीनसह पळविल्या भोजन प्लेट, सिंदीतील चोरटे सीसीटीव्हीत कैद
वर्ध्यात संगणक, थंब मशीनसह पळविल्या भोजन प्लेट
Image Credit source: t v 9
Follow us on

वर्धा : सिंदी (रेल्वे) शहरातील नामांकित दोन शाळेत पहिल्यांदाच झालेल्या चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यात चोरट्यांनी शाळेतील संगणकासह विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी असलेले ताटही लंपास केले. या चोऱ्यांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे शाळेत लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाले आहे. सिंदी (रेल्वे ) (Sindi) शहरातील नामांकित केसरीमल नगर विद्यालय (Kesrilal Nagar Vidyalaya) तसेच पालिकेच्या टिळक प्राथमिक शाळेत चोरीची घटना घडली. नगर विद्यालयातून लॅपटॉप, मॉनिटर, पीसीओ, प्रिंटर, बायोमेट्रिक थंम मशीन, सीसीटीव्ही कॅमेरा आदी सर्व लंपास केले. चोरी गेलेला मुद्देमाल 41 हजार 440 रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ

भोजनाच्या 512 प्लेट लंपास

टिळक प्राथमिक शाळेतून विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाच्या 512 प्लेट (ताट) लंपास करण्यात आल्या. तो मुद्देमाल 10 हजार 200 रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही चोऱ्यांमुळे शहरात एकच खळबळ उडाली. सदर चोरीची सिंदी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर कैद झाले आहेत. पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

चोरट्यांनी शाळेलाही सोडले नाही

चोरट्यांनी आपला मोर्चा शाळेकडं वळविला. शाळेतील साहित्य लंपास केले. यावरून चोर कोणत्या पातळीवर पोहचलेत, याचा अंदाज येतो. शाळेतील उपयोगाच्या छोट्याछोट्या वस्तू या चोरट्यांनी लंपास केल्यात. घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानं आता हे चोरटे रडारवर आले आहेत. पोलीस त्यांना अटक केल्याशिवाय राहणार नाही.