वसतिगृहातील भोजनात सापडल्या अळ्या, निकृष्ट भोजन मिळत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

| Updated on: Oct 16, 2022 | 3:50 PM

विद्यार्थ्यांना मागील दोन-तीन महिन्यांपासून मेसबाबत समस्या येत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

वसतिगृहातील भोजनात सापडल्या अळ्या, निकृष्ट भोजन मिळत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
निकृष्ट भोजन मिळत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Image Credit source: tv 9
Follow us on

महेश मुंजेवार, TV9 मराठी, प्रतिनिधी, वर्धा : वर्ध्याच्या महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील (Hindi University)वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या निघाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. रात्रीच्या जेवणात अळ्या निघाल्यानं काही विद्यार्थ्यांना उलट्या झाल्याची माहिती आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी रात्रीच्यावेळी नारे देत कारवाईची मागणी केलीय. हिंदी विश्वविद्यालयातील वसतिगृहातील (in hostel) विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या दिसल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. तसे फोटोही व्हायरल झालेत.

विद्यार्थ्यांना मागील दोन-तीन महिन्यांपासून मेसबाबत समस्या येत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. विद्यापीठ प्रशासनानं मध्यरात्री विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तोडगा काढला असल्याचं बोललं जातंय.

गेल्या चार महिन्यांपासून आम्ही चांगल्या अन्नाची मागणी करत आहोत. बैठकाही होत आहेत. पण, त्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली दिसत नाही.

हे हिंदी विश्वविद्यालय देशात प्रसिद्ध आहे. देशभरातील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतात. अशावेळी अन्न चांगलं मिळत नसेल, तर विद्यार्थ्यांची पंचाईत होते.

विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून विद्यार्थी मेसबाबत तक्रारी करत आहेत. परंतु, प्रशासनानं याची दखल न घेणे ही अतिशय गंभीर बाब आहे.

यावेळी तर चक्क अळ्याचं सापडल्या. असं अन्न महाविद्यालयीन विद्यार्थी कसं खातील, असा प्रश्न निर्माण होत आहे.