तुम्हारे जित से जादा हमारे हार की चर्चा है! पोट्टे हो, पक्षानं तिकीट दिलं असतं तर… निकाल जाहीर होताच कराळे मास्तरांची फक्कड प्रतिक्रिया

Nitesh Karale Reaction: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने विजय खेचून आणला. अभिजीत वंजारी हे विजय झाले. त्यावर बंडखोर उमेदवार नितेश कराळे मास्तरांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

तुम्हारे जित से जादा हमारे हार की चर्चा है! पोट्टे हो, पक्षानं तिकीट दिलं असतं तर... निकाल जाहीर होताच कराळे मास्तरांची फक्कड प्रतिक्रिया
तुम्हारे जित से जादा हमारे हार की चर्चा है!
| Updated on: Oct 29, 2026 | 6:33 AM

Nagpur Graduate Constituency election result 2026: राज्यात पदवीधरच्या 3 जागांसाठी आणि शिक्षक मतदारसंघाच्या 2 जागांसाठी निवडणूक झाली. विधान परिषदेच्या या 5 जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीने खिशात घातल्या. दोन जागांवर महायुती सरस ठरली. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात, नागपूरमध्ये महाविकास आघाडीने विजय मिळवला. काँग्रेसचे अभिजीत वंजारी हे विजय झाले. भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यासाठी मोठी रणनीती आखली असताना आणि तयारी असतानाही त्यांचा पराभव झाला. या सर्व गोळाबेरीजवर बंडखोर उमेदवार नितेश कराळे मास्तरांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

नितेश कराळे यांना 25 हजार मतं

Loading...

नितेश कराळे यांनी पदवीधर मतदारसंघात 25 हजार मतं मिळवले. ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याच दुसऱ्या पसंतीच्या मताच्या आधारे नागपूर पदवीधरमध्ये अभिजीत वंजारींचा विजय सोपा झाला. या मतदारसंघात जर आपल्याला पक्षाने अधिकृत तिकीट दिलं असतं तर चित्र वेगळं असतं असे नितेश कराळे यांनी प्रतिक्रिया दिली.

लोकांनी मतदानातून प्रत्युत्तर दिले

आमच्या बॅलेट पेपरवर अभिजीत वंजारीना जास्तीत जास्त मतदान होतं. अभिजीत वंजारींनी स्वतः श्रेय घेऊ नये. मी मत मागताना प्रत्येक वेळेस लोकांना ही निवडणूक दोन नंबर वर जाणार असल्याचे सांगितले, मला एक नंबरचा मत दिल्यानंतर दोन नंबरचा मत तुमच्या आवडीच्या व्यक्तीला द्या. बीजेपी विरोधात लोकांचा रोष असल्यामुळे दोन नंबरचा मत अभिजीत वंजारी यांना दिलं. बीजेपीने दोन नंबरचा मत मागितले नाही हे त्यांच्यासाठी घातक ठरलं. त्यांनी दोन नंबर मागितलं असतं तर माझ्या बॅलेट वर सारखेच दोन नंबर त्यांना असते आणि बीजेपी ची सीट देखील येथे निवडून येऊ शकली असते. हा निकाल नवीन अध्याय घेऊन महाराष्ट्रात आला आहे. तुम्ही जर एखाद्या काम करणाऱ्याची सीट डावलत असाल तर लोक त्याला आपल्या मतदानातून प्रत्युत्तर देईल, असे कराळे मास्तर म्हणाले.

तुम्हारे जित से जादा…

दरम्यान, नितेश कराळे यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट केली आहे. त्यात, “तुम्हारे जित से जादा हमारे हार की चर्चा है. नागपूर पदवीधरमध्ये आपणच किंगमेकर ठरलो आहोत. आपल्याला 25 हजार तरुणांनी मतदान केलं. आपल्याला मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतांच्या आधारे आता निकाल ठरला आहे.” असे ते म्हणाले. आपले मत निर्णायक ठरले. आपण उभे राहिलो नसतो तर निवडणुकीची रंगत वाढली नसती. आपण ज्या विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी लढलो, त्यांच्यासाठी विरोधकांनी काय केले असा सवालही कराळे मास्तरांनी विचारला. शाळा आणि संस्था उभ्या करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. हे लोक एकही मुद्दा मांडत नाहीत, तरीही पक्ष त्यांना तिकीट देतात. आपल्याला जर पक्षाने तिकीट दिलं असतं तर आज रात्री डीजे वाजवत घरी आलो असतो, अशी भन्नाट प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us