Wardha : बालगृहातील 64 बालकांना चरखा ओळख, स्वयंरोजगाराकरिता दिले सुत कताईचे प्रशिक्षण

| Updated on: May 20, 2022 | 10:41 AM

बालगृह व निरीक्षणगृहातील बालकांना महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या विचारांवर आधारित चरखा चालविण्याचे कौशल्य विकसित करणे, तसेच त्यांना स्वयंरोजगाराकरिता तयार करणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे.

Wardha : बालगृहातील 64 बालकांना चरखा ओळख, स्वयंरोजगाराकरिता दिले सुत कताईचे प्रशिक्षण
बालगृहातील 64 बालकांना चरखा ओळख
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

वर्धा : वर्धा (Wardha) जिल्हा महिला व बाल विकास (Women & Child Welfare Department) अधिकारी कार्यालयाच्यावतीने ग्राम विकास संस्था, गोपुरी यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील बाल व निरिक्षणगृहातील 12 वर्षाच्या वरील 64 बालकांना चरखा ओळख व सुत कताईचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा नुकताच शुभारंभ सोहळा झाला. त्यावेळी अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच अनेक मान्यवरांनी बालगृहातील मुलांना मागदर्शन देखील केले. महात्मा गांधी व विनोबा भावे (Mahatma Gandhi, Vinoba Bhave) यांच्या विचारांवर आधारित चरखा चालविण्याचे कौशल्य विकसित करणे हा संस्थेचा हेतू आहे. मुलांनी प्रत्यक्ष सुत कताईचा आनंद घेतल्याची माहिती सुध्दा संस्थांनी सांगितली आहे.

स्वयंरोजगाराकरिता तयार करणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे

बालगृह व निरीक्षणगृहातील बालकांना महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या विचारांवर आधारित चरखा चालविण्याचे कौशल्य विकसित करणे, तसेच त्यांना स्वयंरोजगाराकरिता तयार करणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या गटातील बालकांना ग्राम सेवा मंडळ, गोपुरीचे कार्यकारी संचालक अतुल शर्मा यांनी गांधी विचारधारा व खादी या विषयावर मार्गदर्शन केले आहे. मुलांना सुत कताईचे प्रशिक्षण दिले. मुलांनी प्रत्यक्ष सुत कताईचा आनंद घेतला. संस्थेच्या विश्वस्थांनी आलेले प्रशिक्षणार्थी व पाहुण्यांचे स्वागत केले. सदर प्रशिक्षण वेगवेगळ्या गटात चालणार असून मुलांना स्वयंरोजगारासाठी तयार करण्यासोबतच गांधी व विनोबा विचारधारेवर आधारित संदेश देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

इत्यादी मान्यवर उपस्थित होते

प्रशिक्षणाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सचिन आष्टीकर, बाल न्याय मंडळाचे सदस्य स्मिता बढिये, प्रदीप गौतम, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, बालगृह, निरीक्षणगृहाचे अधीक्षक छोटू बोरीकर, समुपदेशक आरती नरांजे, काळजीवाहक श्रीमती रामटेके उपस्थित होते.

बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष न्यायाधीश रचना लोहिया यांच्या मार्गदर्शनानुसार सदर प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली.