खोदकाम करताना विहीर खचली; दोन जण मलब्यात दबले गेले

| Updated on: Mar 02, 2023 | 12:14 PM

दोघांनाही बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे. तीन जेसीबी यंत्राच्या मदतीने मलबा उपसण्याचं काम करण्यात येतंय.

खोदकाम करताना विहीर खचली; दोन जण मलब्यात दबले गेले
Follow us on

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील गौळ शिवारात शेतात विहिरीच्या रिंगचे काम सुरु होते. अचानक विहीर खचली. त्यात विहिरीवर काम करत असलेले दोन जण दबले. दोघांनाही बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे. तीन जेसीबी यंत्राच्या मदतीने मलबा उपसण्याचं काम करण्यात येतंय. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आबुराव सोनवणे, तहसीलदार राजू रणवीर, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी भेट दिली. गौळ शिवारात वरभे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. ५० फूट खोल विहीर खचल्याने दोन मजूर मलब्याखादी दबले गेलेत. ही घटना एक मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

रात्री मदतकार्यात अडथळे

विहिरीचा वरील भाग खचल्याने दोन मजूर विहिरीबाहेर येण्यासाठी धडपड करत होते. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफची चमू पोहचली. त्यानंतर बचावकार्य करण्यात आले. तीन जेसीबींची मदत घेण्यात आली. रात्री मदतकार्यात अडथळे येत होते. हे दोघेही मजूर आहेत. पोटापाण्यासाठी धोकादायक काम करतात. पण, या दुर्घटनेत ते दबले गेलेत. त्यामुळे ते जीवनाशी एकप्रकारे झुंज देत आहेत.

जमिनीची पातळी खोल

शेतीच्या पिकांसाठी जमिनीचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जातो. त्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली आहे. ही पातळी खाली गेल्यामुळे विहिरी खोल खोदाव्या लागतात. काही भागात जमीन भूसभूसीत असते. अशावेळी खोदकाम करत असताना बाजूचा भाग कोसळतो. दुर्घटना घडतात. कोणत्या भागात दुर्घटना घडतात, याचा अभ्यास करून योग्य नियोजन करून खोदकाम केले गेले पाहिजे. अन्यता अशा दुर्घटना होत असतात.