
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी पाकिस्तानविरोधात टिप्पणी करताना मुस्लिम समुदायाला लक्ष्य करताना दिसत आहे. यावर AIMIM नेते वारिस पठाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, केंद्रीय गृहमंत्र्यांकडे त्या तरुणीविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
वारिस पठान यांची प्रतिक्रिया
वारिस पठाण यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करताना लिहिलं, “ही आहे @Sharmishta__19. हिने जे काही अपशब्द वापरले आहेत, ते कोणताही मुस्लिम सहन करणार नाही. जेव्हा संपूर्ण देश एकत्र उभा आहे, तेव्हा अशा प्रकारची भाषा बोलून ही देशात तणाव पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. आमची भारताच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की हिला तात्काळ ताब्यात घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.”
व्हिडीओमध्ये काय म्हणाली ती तरुणी?
व्हायरल व्हिडीओमध्ये ती तरुणी एका सोशल मीडिया युजरच्या कमेंटला उत्तर देताना दिसत आहे. ती म्हणते, “या मोहतरमेला वाटतं की भारताने कोणत्याही कारणाशिवाय आधीच ओपन फायरिंग केली. दीदी, तुम्ही वेड्या-बिड्या आहात का? पहलगाम हल्ल्याचं नाव ऐकलं आहे का? त्याआधीच्या इतर हल्ल्यांची नावं ऐकली आहेत का? गेल्या कित्येक काळापासून पाकिस्तान अशा खुरापती करत आहे, तर भारताने काहीच करू नये? आम्ही हातावर हात ठेवून बसू शकत नाही. आम्ही महात्मा गांधीचे भक्त नाही आता.”
व्हिडीओमध्ये त्या तरुणीने पैगंबरांना मोहम्मद आणि हूर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणीही केली आहे, ज्यामुळे वारिस पठाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडिया दोन गटांत विभागला गेला. काही लोक त्या तरुणीच्या समर्थनात आहेत, तर अनेकजण याला अत्यंत आक्षेपार्ह आणि समाजात द्वेष पसरवणारा मानत आहेत.
वारिस पठाण यांची मागणी
AIMIM नेते वारिस पठाण यांनी त्या तरुणीच्या टिप्पण्यांना ‘उकसवणाऱ्या’ असे म्हटले आहे. त्यांनी हे केवळ सोशल मीडियावरील बडबडीपुरतं मर्यादित नसून यावर कायदेशीर कारवाईची गरज असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे त्या तरुणीला तात्काळ ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.