वाशिम : समृद्धी महामार्गावर एर्टीगा कार दुभाजकावर आदळली, २ ठार, ३ जखमी

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव एर्टीगा कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्ता दुभाजकावर आदळून हा अपघात घडला आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर तीन जण जखमी झाले आहेत.

वाशिम : समृद्धी महामार्गावर एर्टीगा कार दुभाजकावर आदळली, २ ठार, ३ जखमी
| Updated on: Jul 03, 2025 | 11:27 PM

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. नागपूर दिशेला जाणाऱ्या एका एर्टीगा कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण चुकल्याने कार दुभाजकावर धडकून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गांवरील अपघाताचे प्रमाण मोठे आहे. राज्य सरकारने अनेक उपाय योजना करुनही अपघाताचे प्रमाण कमी झालेले नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

समृद्धी महामार्गावर वाशिमच्या वनोजा कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक 215 वर पुण्यावरून नागपूरच्या दिशेने उमरेडला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला आहे. नागपूर कॉरिडॉरवर वाहन चालकाचे एर्टीगा कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडरला धडकून अपघात झाला आहे.. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, वाहनातील 3 जन गंभीर जखमी झाले आहेत. यात वैदीही जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांचा जागीच मृत्यू झाला असून चेतन जयस्वाल,राधेश्याम जयस्वाल आणि संगीता जयस्वाल हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वाशिमच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.