Washim Shivling | वाशिममध्ये विहिरीत सापडले पुरातन शिवलिंग, 300 ते 400 वर्षे जुने असल्याची माहिती; लवकरच प्रतिष्ठापना करण्यात येणार

| Updated on: Jun 07, 2022 | 1:54 PM

विहीर स्वच्छ करत असताना एक मोठा दगड आढळला. तो शिवलिंगाच्या आकाराचा आहे. नर्मदा नदीत अशा प्रकारचे शिवलिंग सापडलेत. त्यामुळं या शिवलिंगाला नर्मदेश्वर शिवलिंग असं म्हणतात.

Washim Shivling | वाशिममध्ये विहिरीत सापडले पुरातन शिवलिंग, 300 ते 400 वर्षे जुने असल्याची माहिती; लवकरच प्रतिष्ठापना करण्यात येणार
वाशिममध्ये विहिरीत सापडले पुरातन शिवलिंग
Follow us on

वाशिम : कारंजा शहरातील टिळक (Tilak Chowk) चौकातील एका विहिरीत गाळ काढणे सुरू होते. त्यात एक पुरातन शिवलिंग आढळले. हे शिवलिंग जवळपास साडे 300 ते 400 वर्ष जुने असल्याची माहिती आहे. कारंजा येथील अजय महाराज (Ajay Maharaj) यांनी ही माहिती दिली. सापडलेले शिवलिंग हे नर्मदा नदीत आढळते. त्यामुळं याला नर्मदेश्वर शिवलिंग (Narmadeshwar Shivling) असेही म्हणतात. सदर शिवलिंग हे सध्या पाण्याने स्वच्छ करण्यात आले. जवळच्याच एका झाडाखाली ठेवण्यात आले. लवकरच त्याची विधिवत स्थापना करण्यात येणार आहे.

नर्मदेश्वर शिवलिंग

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्यानं वाद पेटला. वाशिम जिल्ह्यातही असा शिवलिंग सापडला. विहिरीत गाळ उपसताना हे शिवलिंग सापडले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर शिवभक्तांनी एकच गर्दी केली. पावसाळा लागणार असल्यानं गाळ काढण्याचं काम सुरू होतं. टिळक मित्र मंडळाच्या वतीनं हे काम सुरू होतं. एक मोठा दगड आढळला. तो शिवलिंगाच्या आकाराचा आहे. नर्मदा नदीत अशा प्रकारचे शिवलिंग सापडलेत. त्यामुळं या शिवलिंगाला नर्मदेश्वर शिवलिंग असं म्हणतात.

विहिरीची साफसफाई

टिळक चौकातील ही विहीर सुमारे तीस फूट खोल आहे. गेल्या कित्तेक वर्षांपासून या विहिरीची साफसफाई करण्यात आली नव्हती. त्यामुळं एखाद्या व्यक्तीनं हे शिवलिंग या विहिरीत फेकल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या शिवलिंगाला स्वच्छ पाण्यानं धुण्यात आले. जवळच्या झाडाखाली ठेवण्यात आले. या शिवलिंगाची विधिवत स्थापना करण्यात येणार असल्याचं शिवभक्तांनी सांगितलं. हे शिवलिंग पाहण्यासाठी शिवक्तांनी मोठी गर्दी केली होती.

हे सुद्धा वाचा

शिवभक्त करणार प्रतिष्ठापना

हे शिवलिंग दगडाचे आहे. विहिरीत खोदकाम करताना आढळले. बाहेर काढल्यानंतर शिवलिंग स्वच्छ करण्यात आले. स्वच्छ पाण्याचे धुण्यात आले. हे शिवलिंग इथं कुठून आलं असेल, यावरून चर्चा रंगल्या आहेत. कुठूनही येवो. पण, शिवलिंग असल्यानं शिवभक्त या शिवलिंगाची विधीवत प्रतिष्ठापना करणार आहेत.