Washim Health | हेमोफिलियाग्रस्त विद्यार्थ्यांची जगण्याची धडपड, उपचारासाठी जावे लागते जिल्ह्याबाहेर, वाशिम जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

दहाव्या वर्गात शिकत असलेला ओंकार हा शिक्षणातही अव्वल आहे. परिणामी त्याला दुर्धर आजाराने ग्रासलेला आहे. त्याला महिन्यात 4 वेळा औरंगाबाद ते अमरावती क्लॉटिंग फॅक्टर इंजेक्शन घेण्यासाठी न्यावं लागतं. मात्र वाशिमसारख्या जिल्हाच्या याठिकाणी हा इंजेक्शन मिळतं नाही. त्यामुळं आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे.

Washim Health | हेमोफिलियाग्रस्त विद्यार्थ्यांची जगण्याची धडपड, उपचारासाठी जावे लागते जिल्ह्याबाहेर, वाशिम जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
वाशिम जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
विठ्ठल देशमुख

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jun 07, 2022 | 1:11 PM

वाशिम : जिल्ह्यात हेमोफिलियाच्या रुग्णांना क्लॉटिंग फॅक्टर इंजेक्शन घेण्यासाठी चक्क औरंगाबाद (Aurangabad) ते नागपूर किंवा अमरावती (Amravati) जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात हेमोफिलिया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील जऊळका येथील ओंकार सरोदे वय 17 वर्ष आहे. याला जन्मताच हिमोफिलिया (Haemophilia) सदृश या गेल्या अनेक वर्षांपासून आजाराने त्रस्त आहे. परिणामी घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ओंकारची आई व वडील शेतात रोजमजुरी करतात. आपला उदरनिर्वाह करतात. मात्र आपल्या पोटच्या मुलाला हिमोफिलिया सदृश आजाराने त्रस्त असल्याची चिंता त्यांना भेडसावत आहे.

महिन्यात चार वेळा दुसऱ्या जिल्ह्यात

दहाव्या वर्गात शिकत असलेला ओंकार हा शिक्षणातही अव्वल आहे. परिणामी त्याला दुर्धर आजाराने ग्रासलेला आहे. त्याला महिन्यात 4 वेळा औरंगाबाद ते अमरावती क्लॉटिंग फॅक्टर इंजेक्शन घेण्यासाठी न्यावं लागतं. मात्र वाशिमसारख्या जिल्हाच्या याठिकाणी हा इंजेक्शन मिळतं नाही. त्यामुळं आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे. मोलमजुरी करणाऱ्या ओंकारचे आई-वडील आपल्या शाळेत हुशार असणाऱ्या ओंकारला त्याच्या उपचारासाठी व शिक्षणासाठी काही तरी हातभार लागेल. या मदतीच्या आशेवर अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत.

रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी

जिल्ह्यात हेमोफिलियाच्या रुग्णांना क्लोटिंग फॅक्टर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पाऊल उचलणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी हेमोफिलियाच्या रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. असे मत समाजसेवक नंदू ओधीया, ओंकारचे वडील सुरेश सरोदे व ओंकार सरोदे यांनी व्यक्त केले. हेमोफिलियाच्या रुग्णांना क्लॉटिंग फॅक्टर इंजेक्शन घ्यावे लागते. ते वाशिम जिल्ह्यात मिळणं आवश्यक आहे. रुग्णांना वारंवार बाहेरच्या जिल्ह्यात जाणे परवडणारे नाही. त्यामुळं वाशिममध्ये हे इंजेक्शन उपलब्ध करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या मागणीला आरोग्य विभाग कसा प्रतिसाद देते हे पाहावे लागेल.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें