गणित विषयाची भीती करा दूर; हसत खेळत गणित अध्यापन कसं करालं?

वाशिममधील एका जिल्हा परिषद शिक्षकानं गणित सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी प्रयोग केले. ते त्यात यशस्वी झाले. आता त्यांच्या या प्रयोगाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.

गणित विषयाची भीती करा दूर; हसत खेळत गणित अध्यापन कसं करालं?
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 11:00 AM

वाशिम : गणित हा काही विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा विषय. पण, तो सोप्या पद्धतीने कसा करता येईल, यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. त्यात जिल्हा परिषदेचे शिक्षक पुढं असतात. वाशिममधील एका जिल्हा परिषद शिक्षकानं गणित सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी प्रयोग केले. ते त्यात यशस्वी झाले. आता त्यांच्या या प्रयोगाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणामध्ये गणित हा विषय बहुतांश विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. त्यामुळे गणित विषयातील प्रारंभिक क्रिया हसत खेळत आणि कृतीयुक्त अध्ययन पध्दतीने शिकवण्यासाठी वाशीम जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने पुढाकार घेतला. शेलगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे शिक्षक नवनाथ यादवराव मुसळे यांनी रस दाखवला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या रंगीबेरंगी गोळ्यांचा वापर करून हसत खेळत गणित हे शैक्षणिक साहित्य निर्माण केले. यामुळे संख्या वाचन, अपूर्णांक, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि क्लिष्ट वाटणाऱ्या गणितीय क्रिया विद्यार्थी हसत खेळत शिकत आहेत.

मुलांना रंगांचे आकर्षण

अलीकडे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये या शैक्षणिक साहित्याला प्रथम क्रमांक मिळाला. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड झाली आहे. लहान मुलांना रंगांचे विशेष आकर्षण असते. पीओपी पावडर व विविध रंगाचा वापर करून हे शैक्षणिक साहित्य तयार केले. याचा उपयोग विद्यार्थी हसत खेळत आनंददायी कृतीयुक्त पद्धतीने कोटीपर्यंत संख्या वाचन करतात. या शैक्षणिक साहित्याचा उपयोग संख्यावाचन पुरताच मर्यादित न राहता इतर अनेक गणिती क्रिया व संकल्पना स्पष्ट करण्यासाठी होतो.

हे शैक्षणिक साहित्य बहुमोल

गणित हा तसा अवघड वाटणारा विषय. मात्र अशा साहित्याने मुले आनंदाने स्वयंअध्ययन करु शकतात. संख्यावाचन, संख्यांचा लहान मोठेपणा, चढता व उतरता क्रम, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक दशांश अपूर्णांक वाचन व लेखन या काही गणिती क्रिया. अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी, शेकडा किंवा टक्केवारीचे वाचन व लेखन, आकृतीबंध अशा विविध क्रिया ह्या एकाच शैक्षणिक साहित्यातून करता येतात. त्यामुळे गणित शिकवण्यासाठी हे शैक्षणिक साहित्य बहुपयोगी आहे असे शिक्षक नवनाथ मुसळे सांगतात.

Non Stop LIVE Update
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.