IPL 2024, PBKS vs CSK : चेन्नई सुपर किंग्सने ठेवलं 168 धावांचं विजयी लक्ष्य, पंजाब आव्हान गाठणार का?

आयपीएल 2024 स्पर्धेतील 53वा साना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सुरु आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत पंजाबने चेन्नईला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. चेन्नईने 20 षटकात 9 गडी गमवून 167 धावा केल्या आणि विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं आहे.

IPL 2024, PBKS vs CSK : चेन्नई सुपर किंग्सने ठेवलं 168 धावांचं विजयी लक्ष्य, पंजाब आव्हान गाठणार का?
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 5:19 PM

आयपीएल प्लेऑफच्या दृष्टीने इथून पुढे प्रत्येक जयपराजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वच संघांची विजयासाठी धडपड सुरु आहे. दोन गुणांसह नेट रनरेट चांगला ठेवावा लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामनाही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघ सध्या प्लेऑपच्या शर्यतीतून बाहेर आहेत. त्यामुळे टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 9 गडी गमवून 167 धावा केल्या आणि विजयासाठी 168 धावांचं आव्हान ठेवलं. चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात काही हवी तशी झाली नाही. पॉवर प्लेमध्ये अजिंक्य रहाणे विकेट गमवून बसला. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि डेरिल मिचेल यांनी डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी केली. मात्र राहुल चहरच्या हाती चेंडू सोपवताच. चेन्नईच्या धावांना खिळ बसली. ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे एकापाठोपाठ एक बाद झाले. शिवम दुबेला आपलं खातंही खोलता आलं नाही. तर हर्षल पटेलने डेरिल मिचेल 30 धावांवर असताना तंबूत पाठवलं. त्यामुळे चेन्नईची स्थिती ढासळली.

मोईन अली आणि रवींद्र जडेजा यांनी पाचव्या गड्यासाठी 26 धावांची भागीदारी केली. मात्र ही जोडी फोडण्यात कर्णधार सॅम करनला यश आलं. त्याने मोईन अलीला बाद केलं आणि धावांच्या गतीला ब्रेक लागला. त्यानंतर मिचेल सँटनरही काही खास करू शकला नाही. त्यालाही राहुल चहरने तंबूचा रस्ता दाखवला. चहरने महत्त्वाचे तीन गडी बाद करत धावगती रोखली. हर्षल पटेलनेही आपल्या भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.