PBKS vs CSK : शिवम दुबे सलग दुसऱ्यांदा गोल्डन डक, टी 20 वर्ल्ड कपआधी टेन्शन वाढलं

Shivam Dube Golden Duck : शिवम दुबेची टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऑलराउंडर म्हणून निवड करण्यात आलीय. मात्र निवड होताच शिवम फ्लॉप ठरलाय. शिवम पंजाब विरुद्ध सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट झालाय.

PBKS vs CSK : शिवम दुबे सलग दुसऱ्यांदा गोल्डन डक, टी 20 वर्ल्ड कपआधी टेन्शन वाढलं
shivam dube golden duck pbks vs csk,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 5:16 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 53 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. पंजाबने या सामन्यात टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईची अडखळत सुरुवात झाली. चेन्नईने पहिली विकेट 12 धावांवर गमावली. त्यानंतर कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि डॅरेल मिचेल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कॅप्टन ऋतुराज गायकवाड 32 धावांवर आऊट झाला. ऋतुराजने 21 बॉलमध्ये 4 चौकार आणि 1 सिक्ससह या धावा केल्या. ऋतुराजला राहुल चहल याने चेन्नईच्या डावातील आठव्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर विकेटकीपर जितेश शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं.

ऋतुराजनंतर शिवम दुबे मैदानात आला. शिवम दुबे आला तसाच परत गेला. दीपक चाहरने शिवमला जितेश शर्मा याच्या हाती पहिल्यात बॉलवर कॅच आऊट केलं. शिवम अशाप्रकारे गोल्डन डक झाला. शिवमची आयपीएलच्या 17 व्या मोसमात पंजाब किंग्स विरुद्ध सलग दुसऱ्यांदा गोल्डन डक होण्याची वेळ ठरली. शिवमनची आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये निवड करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवम सलग दुसऱ्यांदा डक झाल्याने टीम इंडियाचंही टेन्शन वाढलंय.

शिवम याआधी 1 मे रोजी पंजाब किंग्सं विरुद्धच गोल्डन डक ठरला होता. शिवमला त्या सामन्यात हरप्रीत ब्रार याने एलबीडब्ल्यू आऊट केलं होतं. दरम्यान 1 जूनपासून टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्याआधी 30 एप्रिल रोजी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. त्यानंतर टीम इंडियाच्या बऱ्याच खेळाडूंनी आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी केलीय. यामध्ये हार्दिक पंड्या, रोहित शर्मा आणि शिवम दुबेचाही समावेश आहे. वर्ल्ड कपआधी या प्रमुख खेळाडूंच्या फ्लॉप कामगिरीमुळे टीम इंडियाचंही टेन्शन वाढलंय.

दुबे सलग दुसऱ्यांडा गोल्डन डक

पंजाब किंग्स प्लेईंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.

चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), अजिंक्य रहाणे डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन आणि तुषार देशपांडे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.