weather update : 24 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, आयएमडीचा हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी

पावसाबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील 24 तासांमध्ये अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राला देखील मोठा इशारा देण्यात आला आहे.

weather update : 24 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, आयएमडीचा हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
imd Weather Update
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 4:02 PM

भारतीय हवामान विभागाकडून (IMD) ऑगस्ट महिन्यासंदर्भात पावसाचा जो अंदाज वर्तवण्यात आला होता, तो खरा ठरला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारली. महाराष्ट्रात तर पाऊसच पडला नाही. संपूर्ण ऑगस्ट महिना राज्यात पाऊस पडला नसल्यामुळे खरीप पिकं धोक्यात आली आहेत, त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. मात्र आता दिलासादायक बातमी म्हणजे देशात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून, पुढील 24 तासांमध्ये तब्बल 24 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच काळात एक मोठं संकट देखील येणार आहे, ते म्हणजे या काळात 80 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे, या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वाऱ्याचा फटका हा पिकांना बसू शकतो. या काळात मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असंही भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, वेगाने वारे वाहत आहेत, त्यामुळे भारताच्या पूर्वेकडील राज्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील राज्यांमध्ये वादळी वारा तसेच विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता आहे.

या राज्यांना आयएमडीचा हाय अलर्ट

पुढील 24 तासांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्किम, गुजरात, महाराष्ट्र, त्रिपुरा, आसाम, नागलँड, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगाणा या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात प्रति तास 80 किमी वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात देखील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे, उर्वरीत राज्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us