
मोठे मोठे लोक बोलले तर काय बोलणार? फेका मग बोलायची काय गरज आहे ? कबरीला संरक्षण तुम्हीच देताय आणि पैसेही देताय तुम्हीच. ते बोलले म्हणजे देशच बोलला आहे. औरंगजेब हा नालायक होता. पिव्वर नालायक होता. येताना त्याने आमची मंदिरं पाडली. ती पैदास काय चांगली होती का? औरंगजेबाची कबर काढायची तर काढा. करायचे ते करतात.बाबरी मशीदचं काय केलं? करणारे कधीच सांगत नाहीत अशी प्रतिक्रीया मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
अधिवेशन झाल्यावर आपण शांत बसणार नाही.सर्वांना प्रमाणपत्र देण्यात यावेत. शिंदे समिती काम करीत नाही.उपोषण सोडताना गुन्हे मागे घेऊन म्हणाले होते. मात्र गु्न्हे काही मागे घेतलेले नाही. सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी काढावा. वारंवार सांगत आहोत
आमदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून कुणबी प्रमाणपत्र लागू करावे.कोणत्याही पक्षाचे असो मराठा आमदारांनी हा मुद्दा लावून धरावा असेही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
हा व्हिडीओ कुठला आहे, हा पोलिसांनी तपास करून शोधायला हवं,ज्या जिल्ह्यातील हा व्हिडिओ आहे तेथील SP वर संशय निर्माण होईल असे वागू नये,याचे उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावे अशी मागणी कैलास बोराडे याच्या व्हायरल व्हिडीओ संदर्भात जरांगे पाटील यांनी केली आहे.
व्हिडिओ संदर्भात कारवाई केली का ? पालकमंत्र्यांनी याची काही माहिती घेतली का ? धर्म,देव आणि महापुरुष यापलीकडे गढूळ व्यक्तींना जातीवादाचं वेड लागले आहे.सरकारकडून पडताळणी झाल्यावर मी नाव घेईल. प्रशासनाची खात्रीशीर अधिकृत माहिती आल्यावर सांगेल.तोच व्यक्ती प्रामाणिकपणे सांगेल.महादेव भक्त स्वतः कबूल करतो.माहिती समोर न आल्यास पालकमंत्री अडचणीत येणार. पालकमंत्री यांनी पडताळणीवर दबाव आणला असे म्हणता येईल. जिल्ह्याचा पालकमंत्री या फेऱ्यात येईल असेही जरांगे म्हणाले.
छगन भुजबळ हा सडलेल्या डोक्याचा आहे. यांच्या डोक्यात फक्त जातीभेद आहे. सगळ्यांनी मिळून चुकणाऱ्यांचे कान मारायचे.गुन्हे करणारा तो आपला बाब्या असे सुरु आहे. छगन भुजबळ यांचे जातीवादीचे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही.स्वप्न बघून मरशील पण स्वप्न पूर्ण होणार नाही. छगन भुजबळ सारख्या जातीय लोकांनी वाद घडवून आणले आणि आता किनाऱ्यावर बसून ते पाहत बसले आहेत अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.