Monsoon : मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर, अवघ्या 48 तासांमध्ये होणार दाखल..! हवामान विभागाचे काय आहेत संकेत?

| Updated on: Jun 09, 2022 | 1:57 PM

गेल्या काही दिवासांपासून वातावरणात बदल झाला असून ठिकठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मशागत झालेल्या शेत जमिनीसाठी या पावसाचा फायदा झाला आहे. खरिपपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असून आता समाधानकारक पाऊस झाला की, शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवण्यास सज्ज राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचे आगमन आणि पेरणीला घेऊन शेतकरी संभ्रमाात होता.

Monsoon : मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर, अवघ्या 48 तासांमध्ये होणार दाखल..! हवामान विभागाचे काय आहेत संकेत?
आगामी दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Follow us on

मुंबई :  (Monsoon) मान्सून आज दाखल होणार की उद्या..याची उत्सुकता राज्यातील प्रत्येक नागरिकाला लागली आहे. असे असातानाच (IMD) हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाबद्दल शुभ संकेत दिले आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून (Maharashtra) राज्यामध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आगामी काही काळात मान्सून हा मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात व्यापला जाणार आहे. तर गोव्यासह दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकात मान्सूनचे आगमन होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती तो अखेर दोन दिवसांमध्ये दाखल होऊन खरिपाच्या पेरण्या वेळेत होती असा आशावाद आहे.

बदलत्या वातावरणाचा खरिपाला फायदा

गेल्या काही दिवासांपासून वातावरणात बदल झाला असून ठिकठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मशागत झालेल्या शेत जमिनीसाठी या पावसाचा फायदा झाला आहे. खरिपपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असून आता समाधानकारक पाऊस झाला की, शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवण्यास सज्ज राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचे आगमन आणि पेरणीला घेऊन शेतकरी संभ्रमाात होता. पण आता दोन दिवसांमध्ये आगमन झाल्यास सर्वकाही वेळेवर होणार आहे.

हे सुद्धा वाचा

मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र, कर्नाटक तसेच पश्चिम बंगालच्या उपसागरातून मान्सून वारे पुढे सरकण्यासाठी अनुकूल परस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाचे डोळे आकाशाकडे लागले होते. आता मात्र, ढगाळ वातावरणासह पावसाचे आगमन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मान्सूनपूर्व पावसाचा दिलासा

राज्यात मान्सूनचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले असले तरी राज्यात आतापर्यंत झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने दिलासा मिळालेला आहे. शेती कामे उरकून शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतिक्षेत आहे. आता दोन दिवसांनी पावसाने हजेरी लावली तर सर्वकाही वेळेत होणार आहे. खरीप हंगामात वेळेत पेरण्या झाल्या की उत्पादन वाढीसही त्याचा उपयोग होतो.