जातीवाद संपण्यासाठी किती वर्षे लागणार? मोहन भागवत यांनी सांगितली तारीख

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीवाद संपवण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याची माहिती दिली आहे. तसेच जातीवाद संपवण्यासाठी आणकी किती वर्षे लागतील यावरही भाष्य केले आहे.

जातीवाद संपण्यासाठी किती वर्षे लागणार? मोहन भागवत यांनी सांगितली तारीख
Mohan Bhagwat
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 18, 2026 | 5:05 PM

भारताच्या ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात जातीवाद पहायला मिळत आहे. अनेकदा दलितांना चुकीची वागणूक दिली जाते. जातीवाद संपवण्यासाठी आणि मागास समाजाला प्रकाशझोतात आणण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. अशातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीवाद संपवण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याची माहिती दिली आहे. तसेच जातीवाद संपवण्यासाठी आणकी किती वर्षे लागतील यावरही भाष्य केले आहे. भागवत नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

भारतातून जातीवाद नष्ट कधी होणार?

मोहन भागवत यांनी आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली होता. यावेळी त्यांनी जातीवाद मुळापासून नष्ट करण्याचे करण्याचे आवाहन केले आहे. भागवत म्हणाले की, जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर 10 ते 12 वर्षांत जातीवादाचे उच्चाटन करता येईल. संघाचे उद्दिष्ट स्व-उच्चारण नव्हे तर चारित्र्यनिर्मितीद्वारे भारताला सर्वोच्च वैभवावर पोहोचवणे हे आहे.

जातीवादाचे मनातून निर्मूलन गरजेचे – भागवत

मोहन भागवत यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘जर जातीवादाचे उच्चाटन करायचे असेल तर प्रथम मनातून जात नष्ट करणे आवश्यक आहे. पूर्वी जात व्यवसाय आणि कामाशी जोडली जात होती, परंतु नंतर ती समाजात पसरली आणि भेदभावाचे कारण बनली. हा भेदभाव संपवण्यासाठी, मनातून जातवाद नष्ट करणे आवश्यक आहे. जर हे प्रामाणिकपणे केले तर 10 ते 12 वर्षांत जातीवाद संपेल. संघाचे उद्दिष्ट भारताला वैभवाकडे नेणे आहे, तसेच समाजाला सोबत घेऊन जाणे हे आहे.”

संघ कोणाशीही स्पर्धा करत नाही – भागवत

पुढे बोलताना भागवत म्हणाले की, ‘संघ व्यक्तींच्या चारित्र्य निर्मितीद्वारे राष्ट्रनिर्माणाचे काम करतो आणि ही प्रतिक्रिया म्हणून स्थापन झालेली संघटना नाही किंवा ती कोणाशीही स्पर्धा करत नाही.’ दरम्यान, संघाने शताब्दीच्या निमित्ताने देशभरात वेगेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. संघाशी देशातील करोडो लोक जोडलेले आहेत. संघाच्या इतरही वेगवेगळ्या संघटना आहेत. ज्याद्वारे समाजाचा विकास आणि व्यवस्था सुधारण्यासाठी काम केले जाते.