“…बँकेत घोटाळा नसताना ईडी का”; हसन मुश्रीफ यांनी ईडीला सवालही केला आणि उत्तरही दिलं

| Updated on: Feb 02, 2023 | 7:44 PM

राज्य सहकारी बँक, नाबार्ड, सहकार आयुक्तांचे ऑडिट रिपोर्ट आमच्याकडे आहेत. तरीही अशा पद्धतीने चौकशी का केली जात आहे असा सवाल हसन मुश्रीफांनी केला आहे. मात्र या बँकेची चौकशी का केली जाते आहे.

...बँकेत घोटाळा नसताना ईडी का; हसन मुश्रीफ यांनी ईडीला सवालही केला आणि उत्तरही दिलं
Follow us on

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने यांच्यासह 5 अधिकाऱ्यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. बँकेच्या कारभाराबद्दल ईडीकडून तब्बल 30 तासांच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र ईडीच्या या चौकशीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. चौकशीसाठी पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असले तरी आमदार आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले हसन मुश्रीफ यांनी बँकेत कोणताही घोटाळा नाही मात्र इडीची चौकशी का? असा सवाल उपस्थित केला आहे.

कोणत्याही बँकेत घोटाळा झाला तर चौकशी होत असते मात्र जिल्हा बँकेत घोटाळा नसताना ईडीकडून चौकशी का केली जात आहे असा सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

त्याचबरोबर राज्य सहकारी बँक, नाबार्ड, सहकार आयुक्तांचे ऑडिट रिपोर्ट आमच्याकडे आहेत. तरीही अशा पद्धतीने चौकशी का केली जात आहे असा सवाल हसन मुश्रीफांनी केला आहे. मात्र या बँकेची चौकशी का केली जाते आहे,

त्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत असा खोचक टोला त्यांनी भाजपला आणि किरीट सोमय्यांना लगावला आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेचा ईडीकडून 30 तास तपास करण्यात आला आहे, तरीही या तपासामध्ये काही मिळाले नाही.

त्यामुळे या कारवाईविरोधात बँक लढा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ईडीकडून चौकशी केली गेली. त्या चौकशीमध्ये बँकेने कोणतेही बेकायदेशीर कर्ज दिलेले नाही हेही स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेची ईडीकडून चौकशी का करण्यात आली आहे ते आता सगळ्यानाच माहिती आहे.बँकेतील व्यवहाराबद्दल कोणत्याही गोष्टी ईडीला मिळाल्या नसल्या तरी आमच्या पाच अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ईडीचे अधिकारी घेऊन गेले आहेत.

त्याच बरोबर गेले 30 तास त्यांची चौकशी करण्यात आली असंही हसन मुश्रीफ यांनी सांगितले. त्याचबरोबर बँकेची काही कागदपत्रेही ईडीचे अधिकारी घेऊन गेले आहेत. त्याच बरोबर कर्मचाऱ्यांना त्यांच्या नातेवाईकांनाही भेटू दिलेले नाही अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.