
पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे भाजपाने मोठे यश मिळवले आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने येथे भाजपाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून भाजपाच्या नेतृत्वाला नाराज केले होते. त्यात आपले काका शरद पवार यांच्याशी पुन्हा जुळवून घेण्यासंदर्भात वक्तव्ये चर्चेत असताना दादांची राष्ट्रवादी आणि शरद पवार या दोघांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे मोठा फटका बसला आहे. तर शरद पवार यांना तर पिंपरी-चिंचवड येथे भोपळाही फोडता आला नाही.
महाराष्ट्रातील २९ महानगर पालिकेपैकी २४ महानगर पालिकेत महायुतीला यश आले आहे. राज्यात भाजपाचा पुन्हा एकदा ‘दादा’ पक्ष ठरला आहे. आता दादांचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे पुन्हा शिरकाव करण्याचे मनसुबे उद्धवस्त झाले आहेत. काल आशियातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका असलेल्या महायुतीने मुंबई महानगर पालिकेत २२७ जागांपैकी ११८ जागा जिंकल्या आहेत.एकट्या भाजपने ८९ जागांवर विजय मिळाला आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २९ जागा मिळवल्या आहेत. या मोठ्या यशानंतर मुंबई महानगर पालिकेत भाजपाचा महापौर विराजमान होणार आहे.
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांचा आमदार विश्वजीत कदमांनी केला सत्कार
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीतील महायुतीच्या या ऐतिहासिक यशानंतर भाजपाचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एनडीए आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. मात्र, अजित पवार यांचा या ट्वीटमध्ये उल्लेख केला नाही त्यामुळे आता शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याची मोहिम संपल्यानंतर आता अजित पवार यांचा उपयोग संपल्याने त्यांचा उपयोग संपला असल्याचे म्हटले जात आहे.
अमित शाह यांचे ट्वीट
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला मिळालेलं प्रचंड यश एक गोष्ट स्पष्ट करते – ती म्हणजे आज देशातल्या काना-कोपऱ्यातील जनतेचा विश्वास फक्त आणि फक्त पंतप्रधान श्री. @narendramodi जींच्या नेतृत्वातील NDA सरकारच्या विकासाच्या धोरणावरच आहे.
हे ऐतिहासिक यश…
— Amit Shah (@AmitShah) January 16, 2026
उद्धव ठाकरे यांच्या यूबीटीने मुंबई महानगर पालिकेत ६५ जागा जिंकल्या आहेत. मनसेने ६ जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीने ( शरद पवार )१ जागा जिंकली. काँग्रेसने आश्चर्यचकीत २४ जागा जिंकल्या आणि एआयएमआयएमने ८ जागा जिंकल्या आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने ३ जागा, समाजवादी पक्षाने २ जागा जिंकल्या आहेत तर अपक्षांनी २ जागा जिंकल्या आहेत.
पुणे महानगर पालिका १६५ जागा
पुणे महानगरात १६५ जागा असून भाजपाला १२३, एनसीपी (अजित पवार) २१, काँग्रेस १६, एनसीपी ( शरद पवार ) ३, शिवसेना १, शिवसेना ( युबीटी ) १, मनसे ० , वंचित ०, अशा जागा मिळाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड येथील १२८ जागा आहेत, भाजपा ८४, एनसीपी (अजित पवार ) ३७, शिवसेना ६, शिवसेना ( युबीटी ) ०,मनसे ०, एनसीपी ( शरद पवार ) ०,काँग्रेस ०, इतर १, असा जागा मिळाल्या.
पिंपरी- चिंचवड येथे १२८ जागा आहेत. भाजपा ८४,एनसीपी ( अजित पवार ) ३७, शिवसेना ६, शिवसेना ( युबीटी ) ०, मनसे ०, एनसीपी ( शरद पवार )०, काँग्रेस ०, आरपीआय ०, इतर १, असे नगरसेवक निवडून आले आहेत.