Eknath Shinde: संपणार नाही, थांबणार नाही, आता माघार नाही… एकनाथ शिंदेंचे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना 10 सवाल

| Updated on: Jun 27, 2022 | 5:54 PM

आम्ही काही काळासाठी बाहेर पडलो तर आम्ही घाण, डुक्कर ठरवले गेलो अशी खंतही व्यक्त करण्यात आली आहे. आपल्याच भरवशावर राज्यसभेत जाणारे आज विखाऱी भाषा वापरतात, आमच्या मृतदेहांची आस त्यांना लागली आहे, याबाबत या पत्रात दुख व्यक्त करण्यात आले आहे. शिवसेना नेतृत्वाला या पत्रातून 10 प्रश्न विचारण्यात आलेत.

Eknath Shinde: संपणार नाही, थांबणार नाही, आता माघार नाही... एकनाथ शिंदेंचे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना 10 सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई – सुप्रीम कोर्टात ज्यावेळी 16 बंडखोर आमदारांच्या भविष्याचा निर्णय होत होता, त्याचवेळी बंडखोर आमदारांपैकी दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांचे शिवसेनेला (Shivsena) दहा प्रश्न विचारणारे एक पत्र समोर आले. बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी हे पत्र ट्विट केले. यात शिवसेनेला महत्त्वाचे १० प्रश्न विचारण्यात आले आहेत. हे बंड नाही तर शिवसेनेच्या आत्मसन्मानाची लढाई असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आज आम्हाला विकले गेलेले ठरवणारे, केव्हा, कसे आणि कुठे विकले गेले आहेत, हे या पत्रातून सांगण्याचा उद्देश असल्याचे केसरकरांनी म्हटले आहे. आम्ही काही काळासाठी बाहेर पडलो तर आम्ही घाण, डुक्कर ठरवले गेलो अशी खंतही व्यक्त करण्यात आली आहे. आपल्याच भरवशावर राज्यसभेत जाणारे आज विखाऱी भाषा वापरतात, आमच्या मृतदेहांची आस त्यांना लागली आहे, याबाबत या पत्रात दुख व्यक्त करण्यात आले आहे. शिवसेना नेतृत्वाला या पत्रातून 10 प्रश्न विचारण्यात आलेत.

शिवसेना, उद्धव ठाकरेंना 10 प्रश्न

  1. संजय राऊतांच्या सल्ल्याने अख्खा पक्ष शरद पवारांच्या दावणीला बांधायचा असेल तर मग शिवसेनेचे अस्तित्व काय उरेल
  2. ज्या काश्मीरच्या प्रश्नावर बाळासाहेब ठाकरेंनी ठाम भूमिका घेतली, त्या कलम ३७० च्या वेळी उघडपणे आमच्या नेतयांना बोलता येऊ नये, इतकी वाईट अवस्था का?
  3. सोनिया गांधी आणि शरद पवार यांना खूश करण्याच्या नादात आम्ही आमचा आत्मसन्मान गमावायचा का?
  4. सर्व महत्त्वाची खाती काँग्रेस, राष्ट्रवादीला देऊन टाकायची आणि मुख्यमंत्रीपद तेवढे ठेवायचे, हे योग्य आहे का ?
  5. दाऊदशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या मंत्र्याचा बचाव तरी कसा करायचा ?
  6. राज्यसभा निवडणुकीतही या पक्षांनी शिवसेनेच्याच उमेदवाराला हरवायचे, मग करायचे तरी काय, नुसतं सहन करत बसायचं?
  7. भाजपापासून शिवसेना दूर नेऊ शकाल, पण शिवसेना हिंदुत्वापेक्षा दूर नेणार असाल, तर ते आम्ही कसे खपवून घ्यायचे?
  8. संजय राऊतांचे ऐकून पक्ष चालणार असेल आणि आमच्यासारखअया अनेकवेळा जनतेतून निवडून येणाऱ्या आमदारांना दूर ढकलले जात असेल तर करायचे तरी काय ?
  9. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी बंडूक चालवायची, खांदा संजय राऊतांचा वापरायचा त्यातून मारले जाणार कोम तर पक्षाचे शत्रू नव्हते तर आपणच. हे मान्य का करायचे ?
  10. सत्ता कशाच्या बळावर स्वताला संपवून? हे मान्य नाही शिवसेनेचं अस्तित्वच राहणार नसेल तर मिळणारी पदं, सत्ता काय कामाची ?